13 October 2019

News Flash

मूल हवं की सुवर्णपदक?, सायना नेहवाल म्हणते..

सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप या दोघांनी नुकतीच 'द कपिल शर्मा शो' या कार्यक्रमात हजेरी लावली.

सायना नेहवाल, पारुपल्ली कश्यप

भारताची फुलराणी सायना नेहवाल आणि बॅडमिंटनपटू पारुपल्ली कश्यप या दोघांनी नुकतीच ‘द कपिल शर्मा शो’ या कार्यक्रमात हजेरी लावली. कपिलच्या विनोदाचा मनमुराद आनंद लुटत या दोघांनी त्यांच्या करिअर आणि खासगी आयुष्यातील बऱ्याच गोष्टी मोकळेपणाने सांगितल्या.

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये सायना आणि पारुपल्ली कश्यपने लग्नगाठ बांधली. त्यानंतर पहिल्यांदाच हे दोघे एकत्र सार्वजनिक कार्यक्रमात झळकले. यावेळी उपस्थितांपैकी एकाने सायनाला आगामी ऑलिम्पिक स्पर्धेविषयी प्रश्न विचारला. मूल की ऑलिम्पिकचं सुवर्णपदक यापैकी तू काय निवडशील असा प्रश्न सायनाला विचारण्यात आला. यावर ती म्हणाली, ‘मी सध्या ऑलिम्पिकसाठी तयारी करत आहे. अद्याप मुलासंदर्भात काही विचार केला नाही. ऑलिम्पिकमधील लक्ष्य गाठण्यासाठी पुढील १० महिने फार महत्त्वाचे आहेत.’ यावर पारुपल्ली कश्यपनेही हसत पुढे म्हटले, ‘जर मूल हवं असेल तर ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळणार नाही.’

या कार्यक्रमात पारुपल्ली कश्यपने ‘हमे तुमसे प्यार कितना’ हे गाणं म्हणत सायनाला प्रपोजसुद्धा केलं. सायना आणि पारुपल्ली कश्यप वयाच्या १२व्या वर्षापासून एकमेकांना ओळखतात. या मैत्रीचे रुपांतर हळूहळू प्रेमात झाले आणि गेल्या वर्षी त्यांनी लग्नगाठ बांधली.

First Published on May 14, 2019 6:37 pm

Web Title: saina nehwal disclosed aiming for the olympic gold over having her own baby on the kapil sharma show