स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘विठुमाऊली’ मालिका गेली दोन वर्षे अविरतपणे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवते आहे. विठुराया आणि पुंडलिकाच्या भक्तीचा सोहळा अनुभवल्यानंतर आता या मालिकेत नवा अध्याय सुरु होतोय. संत नामदेवांच्या रुपात संतपरंपरेची अखंड गाथा पाहायला मिळणार आहे. खास बात म्हणजे छोट्या नामदेवांची भूमिका साकारणार आहे बालकलाकार अमृत गायकवाड. अमृतने लहान वयातच आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. याआधी छोट्या भीवाच्या रुपात प्रेक्षकांनी अमृतला भरभरुन प्रेम दिलंय. अमृतच्या अभिनयातला हाच निरागसपणा छोट्या नामदेवांच्या रुपातही अनुभवायला मिळणार आहे.

Swargandharva Sudhir Phadke musical biopic trailer launch
राम जन्मला गं सखी…; बाबुजींच्या भावसंगीताचा रंजक प्रवास, ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित
Govinda stopped the fleet of vehicles and bought shoe from small shop
गोविंदाला बुटाची भुरळ! रोड शो थांबवून खरेदी केले बूट; किंमत ऐकून तुम्ही म्हणाल…
Loksatta entertainment  Relive the memories of Geetramayana on the occasion of Swaragandharva Sudhir Phadke
‘स्वरगंधर्व सुधीर फडके’च्या निमित्ताने ‘गीतरामायणा’च्या आठवणींना उजाळा..
laxmikant berde son abhinay berde
लक्ष्मीकांत बेर्डेंच्या लेकाचं रंगभूमीवर पदार्पण! पहिल्या नाटकाबद्दल अभिनय म्हणाला, “आज आईबाबांच्या आशीर्वादाने…”

वारकरी संप्रदायाचे प्रचारक नामदेव महाराज नामवेदाचे व नामविद्येचे आद्य प्रणेते असलेले महाराष्ट्रातील एक थोर संत होते. आपल्या कीर्तनकलेमुळे प्रत्यक्ष पांडुरंगाला डोलायला लावणारी त्यांची कीर्ती होती. संत नामदेव प्रत्यक्ष श्रीविठ्ठलाच्या निकटवर्ती असलेला सखा होता, असं मानलं जातं. संत नामदेव हे वारकरी संप्रदायाचे महान प्रचारक असून भारतभर त्यांनी त्या बाबतीत भावनिक एकात्मता साधली. अश्या या थोर संताची गाथा मालिकेतून अनुभवायला मिळणं हा नेत्रदीपक सोहळा असेल.