26 January 2021

News Flash

“बळजबरी म्हणून नाही तर…”; दिलीप कुमार यांची काळजी घेण्याविषयी सायरा बानू व्यक्त

"त्यांची प्रकृती फार बरी नाही."

अभिनेत्री सायरा बानो यांनी पती दिलीप कुमार यांच्या तब्येतीविषयीचे अपडेट्स नुकत्याच एका मुलाखतीत दिले. त्याचप्रमाणे “लोकांकडून कौतुकाचे शब्द ऐकायला मिळावेत यासाठी नाही तर त्यांच्यावर असलेल्या प्रेमापोटी मी त्यांच्या आरोग्याची काळजी घेतेय. त्यासाठी मला कोणी बळजबरी केलेली नाही”, असंही त्या म्हणाल्या.

‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत त्या म्हणाल्या, “दिलीप साहब यांची काळजी मी त्यांच्यावर असलेल्या प्रेमापोटी घेते. मी माझ्या कौतुकाची अपेक्षा नाही करत. त्यांना स्पर्श करायला मिळणं हीच माझ्यासाठी सर्वांत आनंदाची गोष्टी आहे. ते माझा श्वास आहेत.”

दिलीप कुमार यांच्या तब्येतीविषयी त्या पुढे म्हणाल्या, “त्यांची प्रकृती फार बरी नाही. ते अशक्त आहेत आणि त्यांची रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा कमी आहे. त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करा. आमच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक दिवसासाठी आम्ही देवाचे आभारी आहोत.”

करोनाच्या प्रादुर्भावामुळे मार्च महिन्यापासून दिलीप कुमार यांना घऱातच विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे. त्यांच्या आरोग्यासाठी योग्य ती सर्व काळजी घेतली जात असल्याचं सायरा बानो यांनी सांगितलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 7, 2020 8:31 am

Web Title: saira banu reveals dilip kumar is not too well ssv 92
Next Stories
1 रवी पटवर्धन यांच्याविषयी बोलताना निवेदिता सराफ भावूक, म्हणाल्या..
2 समुद्राचं निळशार पाणी, रेड बिकिनी अन् नवे मित्र… अभिनेत्रीचा ‘हा’ व्हिडीओ झालाय व्हायरल
3 अनिल कपूर- अनुराग कश्यप यांच्यात जोरदार ट्विटर-वॉर
Just Now!
X