दिवगंत अभिनेते दिलीप कुमार यांची पत्नी, ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानू यांची २४ ऑगस्ट रोजी प्रकृती खालावल्याने त्यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. सायरा बानू यांना श्वास घेण्यास त्रास होणे, उच्च रक्तदाब आणि इतक काही समस्या जाणवत होत्या. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण आता सायरा बानू यांनी अँजिओग्राफी करण्यास नकार दिला आहे.

आता हिंदुजा रुग्णलयातील डॉक्टरांनी सायरा बानू यांच्या प्रकृती विषयी माहिती दिली आहे. ‘काल, त्यांची कार्डिअॅक टेस्ट झाली आणि त्यांना कोरोनरी सिंड्रोम असल्याचे निदान झाले. सध्या सायरा बानू यांनी अँजिओग्राफी करण्यास नकार दिला आहे. एकदा त्यांनी परवानगी दिली की डॉक्टर त्यांची अँजिओग्राफी करतील’ अशी माहिती डॉक्टरांनी पीटीआयला दिली आहे.

supreme court on private hospitals bed
राखीव खाटांच्या मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयाकडून खासगी रुग्णालयांची कानउघडणी; म्हणाले, “ही रुग्णालये सरकारी अनुदान घेतात पण…”
haryana school bus accident
हरियाणातील स्कूलबस अपघात प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; शाळेच्या मुख्यध्यापिकेसह तिघांना अटक
Abhishek Ghosalkar murder case
अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणाचा तपास सीबीआय किंवा एसआयटीकडे द्या, तेजस्वी घोसाळकरांची उच्च न्यायालयात मागणी
pashmina march will be held there on April 7 to highlight the issues in Ladakh
लडाखवासीयांचा आक्रोश सरकारच्या कानावर पडतच नाही; तुम्हाला तरी ऐकू येतोय?

हिंदुजा रुग्णलयात सायरा बानू यांच्यावर उपचार करत असलेल्या डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, दिलीप कुमार यांच्या निधनानंतर सायरा बानू या नैराश्याचा सामना करत आहेत. ‘त्या फार वेळ झोपत नाहीत. त्यांना घरी परत जायचे आहे’ असे डॉक्टरांनी म्हटले आहे.

काही दिवसांपूर्वी सायरा बानू यांचे पती दिलीप कुमार यांचे निधन झाले. ते ९८ वर्षांचे होते. सायरा बानू या दिलीप कुमार यांच्या प्रकृतीची काळजी घेत होत्या. दिलीप कुमार रुग्णालयात असताना सायरा बानू त्यांच्या प्रकृती विषयी माहिती देत असत. त्यांच्या लग्नाला ५४ वर्षे झाली होती. आता सायरा बानू यांना रुग्णालयात दाखल केल्यामुळे चाहते चिंता व्यक्त करत आहेत. त्या लवकरात लवकर बऱ्या व्हाव्या यासाठी प्रार्थना करत आहेत.