16 February 2019

News Flash

माझ्या ‘कोहिनूर’साठी प्रार्थना करा- सायरा बानो

गुरुवारी अचानकपणे काही ट्विट सायरा बानो यांनी केले.

सायरा बानो, दिलीप कुमार

हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या प्रकृतीविषयी त्यांची पत्नी सायरा बानो यांनी नुकतेच काही ट्विट केले आहेत. माझ्या ‘कोहिनूर’च्या उत्तम आरोग्यासाठी आणि ते आनंदी राहावे यासाठी प्रार्थना करा असं आवाहन त्यांनी चाहत्यांना ट्विटरद्वारे केलं आहे.
दिलीप कुमार यांचं अधिकृत ट्विटर अकाऊंट फैझल फारूखी सांभाळतात. दिलीप कुमार यांच्याकडून ते नेहमी ट्विट करत असतात. मात्र गुरुवारी अचानकपणे काही ट्विट सायरा बानो यांनी केले. ‘पुढील काही ट्विट्स सायरा बानो खान यांच्याकडून केले जात आहेत’, असं सुरुवातीलाच ट्विटमध्ये स्पष्ट करण्यात आलं.

‘साहब ठीक आहेत आणि घरी आराम करत आहेत. तुमचं प्रेम सतत त्यांच्या पाठीशी आहे. लाखो चाहत्यांच्या संपर्कात राहायला मला आणि साहब यांना नेहमीच आवडतं आणि गेल्या ५२ वर्षांपासून आम्ही सतत तुमच्या संपर्कात आहोत. २९ जून २०१८ रोजी मी माझ्या ‘कोहिनूर’शिवाय (दिलीप कुमार) एका कार्यक्रमात उपस्थित होती. त्यांच्याशिवाय मी फार क्वचित एखाद्या कार्यक्रमाला हजेरी लावते. असिफ फारुखी यांची मुलगी निदा हिच्या निकाहला मी गेले होते. साहबशिवाय मला तिथं एकटेपणा जाणवला, पण त्या जोडप्याला आशीर्वाद देताना आणि उपस्थितांशी संवाद साधताना मला आनंदही झाला. माझ्या ‘कोहिनूर’साठी प्रार्थना करा. त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि आनंदी जीवनासाठी प्रार्थना करा.’ असं सायरा बानो यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे.

काही दिवसांपूर्वी नियमित आरोग्य तपासणीसाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. ९४ वर्षीय दिलीप कुमार यांच्या प्रकृतीविषयी चाहत्यांनाही सतत चिंता असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी ते प्रार्थना करत असतात.

First Published on July 12, 2018 5:13 pm

Web Title: saira banu tweets regarding bollywood actor and husband dilip kumar