दिग्दर्शक नागराज मंजुळेचा ‘सैराट’ हा चित्रपट सध्या महाराष्ट्रात अक्षरश: धुमाकूळ घालत आहे. मराठी चित्रपटसृष्टीत या चित्रपटाने लोकप्रियता आणि कमाईचे नवे मापदंड रचले आहेत. चित्रपटातील अभिनेत्री रिंकू राजगुरू आणि अभिनेता आकाश ठोसर यांना संपूर्ण महाराष्ट्राने डोक्यावर घेतले आहे. या दोघांच्या भूमिकेसह सहकलाकारांनी केलेल्या कामाचेही तितकेच कौतुक केले जात आहे. ‘लंगड्या’, ‘सल्या’, ‘आनी’ या व्यक्तिरेखांनी प्रेक्षकांना तितकीच भुरळ घातली आहे. यापैकी एका सह-कलाकाराची निवड ही ‘लोकसत्ता‘ने आयोजित केलेल्या ‘लोकांकिका’ या आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेतून झाली होती. ‘सैराट’मध्ये आर्चीची वर्गमैत्रिण दाखविण्यात आलेली ‘आनी’ अर्थात अनुजा मुळ्ये हिची ‘लोकसत्ता लोकांकिका’च्या मंचावरून नागराज मंजुळे यांनी निवड केली होती.

‘लोकांकिका’च्या पहिल्या पर्वात राज्यभरातील आठ विविध केंद्रांवर अनेक मान्यवर मराठी कलाकार आणि दिग्दर्शकांनी परीक्षक म्हणून काम पाहिले होते. परीक्षकांनी पारखी नजरेतून निवडलेले काही कलाकार थेट चित्रपटापर्यंत पोहोचले. पुण्याच्या ‘आयएलएस लॉ’ महाविद्यालयाच्या अनुजा मुळयेला नागराज मंजुळे यांच्यासोबत काम करण्याची संधी चालून आली. पुण्याला झालेल्या विभागीय अंतिम फेरीत ‘चिठ्ठी’ ही एकांकिका सादर झाली तेव्हा त्यांच्यासमोर त्यांचे परीक्षण, मार्गदर्शन करण्यासाठी दिग्दर्शक नागराज मंजूळे उपस्थित होते. या एकांकिकेत अनुजाचं काम पाहिलेल्या नागराजनी तिला त्यानंतर आपल्या आगामी ‘सैराट’ या चित्रपटाच्या ऑडिशनसाठी बोलावून घेतले. दोन ऑडीशन दिल्यानंतर अनुजाच्या सैराटमधील समावेशाबाबत शिक्कामोर्तब देखील झाले. अनुजाने चित्रपटात छोटेखानी भूमिका साकारली असली तरी तिच्या अभिनयाचे विशेष कौतुक केले जात आहे. ‘सैराट’च्या यानिमित्ताने ‘लोकांकिका’मध्ये ‘चिठ्ठी’ या एकांकिकेत अनुजाच्या अभिनयाचा हा व्हिडिओ-

Washim, manuscript Writer, Stabbed, Death, Karanja, Tehsil Office,
दस्तलेखकाच्या मानेवर चाकूने हल्ला, भर तहसील कार्यालय परिसरातच…
Best Bus Monthly Pass Rate Increase Mumbai
बेस्टचा पास महागला; पासधारकांच्या खिशाला कात्री
Kangana Ranaut
चित्रपटसृष्टीने आपल्याला अनेकदा अपमानित केले, कंगना राणावतचा न्यायालयात दावा
Yash Mittal Murder Noida
व्यावसायिकाच्या मुलाची चार मित्रांकडून हत्या; वडिलांकडून मागितली सहा कोटींची खंडणी