‘सैराट झालं जी…’ असं म्हणत गेल्या वर्षी २९ एप्रिलला एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. त्या चित्रपटाची जादू आजही प्रेक्षकांच्या मनावर काय़म आहे. असा हा चित्रपट म्हणजे नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’. रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसर या दोन नवख्या चेहऱ्यांना घेऊन नागराज मंजुळेंनी हा चित्रपट सादर केला. ‘सैराट’ मराठी चित्रपटसृष्टीसाठी एक मैलाचा दगड ठरला. आजवर विविध चित्रपटांनी प्रस्थापित केलेले विक्रम मोडीत काढत सैराट प्रदर्शनाने मराठी चित्रपटसृष्टीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला. त्याचसोबत रिंकू आणि आकाश यांच्या अभिनय कारकिर्दीलाही जोरदार सुरुवात झाली. या चित्रपटानंतर आकाश ‘एफयू’ या महेश मांजरेकर दिग्दर्शित चित्रपटात दिसला. तर रिंकूने ‘सैराट’चाच कन्नड रिमेक असलेल्या ‘मनसु मल्लिगे’मध्ये काम केले. मात्र, ती मराठी चित्रपटात नंतर झळकली नाही.

वाचा : ‘भाभीजी’ फेम शिल्पाचा ‘बोल्ड’ अंदाज तुम्ही पाहिला का?

यावर्षी दहावीची परीक्षा पास झाल्यानंतर रिंकू पुण्यातल्या महाविद्यालयात प्रवेश घेऊन महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करणार असल्याची चर्चा होती. मात्र, तिने अद्याप महाविद्यालयात प्रवेश घेतलेला नाही. याचे कारण म्हणजे आजही तिची जादू प्रेक्षकांवर असून त्यात तसूभरही कमी झालेली नाही. त्यामुळे आपल्या झिंगाट चाहत्यांपासून वाचण्यासाठी ती बारावीची परीक्षाही दहावीप्रमाणे बाहेरुन देणार असल्याचं कळतं.

वाचा : नवाब सैफ अली खानची मालमत्ता वाचून तुम्हीही व्हाल थक्क

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, मग रिंकू नक्की करतेय तरी काय? नुकत्याच एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तिने लवकरच एका चित्रपटात दिसणार असल्याचे सांगितले. त्यासाठी सध्या चित्रपटाच्या कथेच वाचन सुरु असल्याचा खुलासाही तिने केला. मात्र, यात ती कोणती भूमिका साकारणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.