23 January 2018

News Flash

सल्या, लंगड्या फोडणार हास्याची हंडी

दोघांनीही पथकाच्या गोविंदा बरोबर हंडी फोडली.

मुंबई | Updated: August 11, 2017 4:40 PM

रबाज शेख आणि तानाजी गालगुंडेच्या एण्ट्रीने हास्याची हंडी फुटणार

‘कॉमेडीची GST एक्सप्रेस’ कार्यक्रम नुकताच कलर्स मराठी वाहिनीवर सुरु झाला आहे. अवघ्या काही दिवसांतच हा कार्यक्रम बराच चर्चेत आलाय. कार्यक्रमातील विनोदवीर, त्यांची अतरंगी पात्रे, खुसखुशीत विनोदशैली यांनी प्रेक्षकांना पोट धरून हसण्यास भाग पाडले आहे. आता या मंचावर महाराष्ट्राचे लाडके, ज्यांनी ‘सैराट’ या चित्रपटातून अमाप लोकप्रियता मिळवली असे सल्या आणि लंगड्या लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत कलर्स मराठीवरील ‘कॉमेडीची GST एक्सप्रेस’ या कार्यक्रमामधून ते प्रेक्षकांना हसवण्यासाठी सज्ज झाले आहेत. प्रेक्षकांना हा भाग १४ आणि १५ ऑगस्टला रात्री ९ वा. बघायला मिळेल.

वाचा : कोणाचे रेस्तराँ तर कोणाची एअरलाइन्स, जाणून घ्या साउथ स्टार्सचे साइड बिजनेस

दहीहंडी विशेष भागामध्ये GST च्या मंचावर सल्या आणि लंगड्या म्हणजेच अरबाज शेख आणि तानाजी गालगुंडेच्या एण्ट्रीने हास्याची हंडी फुटणार यात काहीच शंका नाही. कार्यक्रमामध्ये दोघांच्या येण्याने हास्याचे स्फोट फुटले. दोघांनीही संदीप पाठक याच्याबरोबर कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी सांभाळली. या दहीहंडी खास भागामध्ये हंडी पथक आले होते ज्यामध्ये या दोघांनीही पथकाच्या गोविंदा बरोबर हंडी फोडली. संदीप, सल्या आणि लंगड्या या तिघांनी मिळून पथकाच्या मुलांसोबत ‘झिंगाट’ या लोकप्रिय गाण्यावर मनसोक्त नृत्य केले. तसेच सल्या आणि लंगड्या या दोघांना या कार्यक्रमाच्या एका भागामध्ये वेगळ्याच रुपात प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. या भागामध्ये सल्या कृष्ण तर लंगड्या पेंद्याची भूमिका करणार आहे. तसेच संदीप पाठक मावशीच्या रुपात दिसणार आहे. या तिघांनीही मिळून मंचावर धुमाकूळ घालत प्रेक्षकांना भरपूर हसवले.

वाचा : ‘बिग बॉस’मध्ये ढिंच्याक पूजाला मिळणार इतरांपेक्षा जास्त मानधन

First Published on August 11, 2017 4:40 pm

Web Title: sairat fame salya langadya aka arbaz shaikh tanaji galgunde in comedychi gst express
  1. No Comments.