माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणारी इयत्ता १२ वीची परीक्षा गुरुवार २१ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. ‘सैराट’ फेम आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरू ही यंदा बारावीची परीक्षा देणार आहे. रिंकू ही टेंभूर्णी येथील जय तुळजाभवानी कला व विज्ञान कनिष्ठ आश्रम महाविद्यालयातील परीक्षा केंद्रातून ही परीक्षा देणार आहे. तिला पाहण्यासाठी कायमच गर्दी होते, मात्र परीक्षेदरम्यान कोणताही गोंधळ होऊ नये म्हणून महाविद्यालयाने पोलिसांकडे बंदोबस्ताची मागणी केली आहे. महाविद्यालयाच्या प्राचार्या जयश्री गवळी सातपुते यांनी एक पत्र लिहीत टेंभूर्णी पोलीस ठाण्याकडे ही मागणी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रिंकू नियमित कॉलेजला जात नसल्याने ती बहिःस्थ विद्यार्थी म्हणून १२ वीची परीक्षा देणार आहे. तिने कला शाखेला प्रवेश घेतला असून मराठी, इंग्रजी, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र असे तिचे विषय असतील. सैराट चित्रपटानंतर तिने दहावीची परीक्षा दिली होती. त्यावेळी तिने सोलापूर जिल्ह्यातील अकलूजमधील जिजामाता कन्या प्रशालेच्या केंद्रातून ही परीक्षा दिली होती. अद्याप पोलिसांनी या बंदोबस्ताबाबत शाळेला काहीही कळवले नसून शाळा पोलिसांच्या उत्तराच्या प्रतिक्षेत असल्याची माहिती आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sairat girl archi rinku rajguru is giving hsc 12th exams center in tembhurni demanding police protection
First published on: 20-02-2019 at 19:04 IST