04 December 2020

News Flash

आता कपिल शर्मा देखील ‘सैराट’ होणार..

'सैराट'च्या या यशाची दखल आता हिंदी टेलिव्हिजनने देखील घेतली आहे.

दिग्दर्शक नागराज मंजुळेच्या 'सैराट' चित्रपटाची टीम लवकरच विनोदवीर कपिल शर्मा याच्या टेलिव्हजन शोमध्ये उपस्थिती लावणार आहे.

हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय असलेल्या ‘द कपिल शर्मा शो’ची टीम देखील झिंगाट गाण्यावर सैराट होऊन धम्माल करताना पाहायला मिळणार आहे. कारण, मराठी चित्रपटसृष्टीसह बॉलीवूडलाही ‘याड लावलेल्या’ दिग्दर्शक नागराज मंजुळेच्या ‘सैराट’ चित्रपटाची टीम लवकरच विनोदवीर कपिल शर्मा याच्या टेलिव्हजन शोमध्ये उपस्थिती लावणार आहे. ‘सैराट’ने मराठी चित्रपटसृष्टीत कमाईचा नवा विक्रम प्रस्थापित केला असून, परशा-आर्चीच्या प्रेमकहाणीला सर्वांनी डोक्यावर घेतले आहे. नुकतेच या चित्रपटाचे दुबईत देखील दमदार शो झाले. तेथेही ‘सैराट’ने सर्वांना ‘झिंगाट’ करून सोडले. ‘सैराट’च्या या यशाची दखल आता हिंदी टेलिव्हिजनने देखील घेतली आहे.

‘कपिल शर्माचा शो’ हा हिंदी चित्रपटांचे प्रमोशन करण्यासाठी ओळखला जातो. पण आता त्याच्या शोमध्ये पहिल्यांदा एखाद्या मराठी चित्रपटाचे कलाकार उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या शोमध्ये काय धम्माल पाहायला मिळणार याची उत्सुकता सर्वांना आहे.
दरम्यान, कपिल शर्माच्या कार्यक्रमात ‘सैराट’ची टीम उपस्थित राहणार असल्याचे निश्चित झाले असले तरी कार्यक्रमाचे चित्रीकरण अद्याप झालेले नाही. यासोबतच हा कार्यक्रम केव्हा टेलिकास्ट केला जाणार याबाबतचीही माहिती समोर आलेली नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 3, 2016 8:25 pm

Web Title: sairat marathi movie team in kapil sharma show
टॅग Marathi Movie,Sairat
Next Stories
1 VIDEO: शाहिदच्या ‘उडता पंबाज’चे शिर्षक गीत प्रदर्शित
2 कपिल सिब्बल यांचे बॉलीवूडमध्ये पदार्पण!
3 चेतन आणि पर्णचा ‘फोटोकॉपी’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!
Just Now!
X