07 August 2020

News Flash

VIDEO: प्रेमासाठी कायपण, ‘सैराट’चा उत्सुकता वाढवणारा ट्रेलर प्रदर्शित

चित्रपटाच्या गाण्यांनी याआधीच प्रेक्षकांना 'येडं लावलं' आहे

दिग्दर्शक नागराज मंजुळेच्या बहुप्रतिक्षीत ‘सैराट’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. भन्नाट लोकेशन्स, जाती-पातीच्या जोखडात सापडलेली एक अप्रतिम प्रेम कहाणी आणि नायिकेचा बिनधास्त अंदाज ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. चित्रपटाच्या गाण्यांनी याआधीच प्रेक्षकांना ‘येडं लावलं’ आहे, तर चित्रपटाच्या टीझरलाही भरभरुन प्रतिसाद मिळाला होता. आता चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्याने चित्रपटाबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. येत्या २९ एप्रिलला परशा आणि आर्ची यांची अनोखी प्रेमकहाणी भेटीला येत आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 22, 2016 5:29 pm

Web Title: sairat official trailer nagraj manjule ajay atul
टॅग Nagraj Manjule
Next Stories
1 पाहा : प्रियांका चोप्राला कोणी पाठवला विशेष संदेश
2 हॅप्पी बर्थडेः आनंद शिंदे यांची पाच सुप्रसिद्ध गाणी
3 ‘हाऊसफुल ३’ चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित
Just Now!
X