News Flash

‘१०० कोटी दिले तर श्वानासोबत सेक्स करशील का?’ साजिदवर आणखी एक आरोप

'लिपस्टिक अंडर माय बुरखा' फेम अभिनेत्री आहाना कुम्रा हिनं साजिद खानवर आरोप केले आहेत.

दिग्दर्शक साजिद खान पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची चिन्हं निर्माण झाली आहेत. कारण ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ फेम अभिनेत्री आहाना कुम्रा हिनं साजिद खानवर गंभीर आरोप केले आहे. काही महिन्यांपूर्वी अभिनेत्री सलोनी चोप्रा हिनं साजिदबद्दल जे सांगितलं तोच अनुभव मला देखील आला, असं आहानानं म्हटलं आहे.

‘साजिद विकृत आहे हे मी ऐकून होतं. एका मिटींगसाठी मी वर्षभरापूर्वी त्याला भेटले. त्यानं मला घरी बोलवलं होतं. कामासंबधी चर्चा करण्यासाठी त्यानं मला बेडरुममध्ये नेलं. त्याची आई घरीच होती त्यामुळे बेडरुममध्ये जाण्यापेक्षा आपण बाहेरच बसूयात असं मी त्याला सुचवलं. पण, आपल्या कामामुळे तिला त्रास नको असं म्हणत बेडरुममध्ये बसून कामाविषयी चर्चा करू असं तो म्हणला. त्याच्या रुममध्ये खूपच अंधार होता. मी त्याला लाईट लावायला सांगितले त्यानं माझं ऐकलंही.

#MeToo: ‘साजिद खान नको तिथे स्पर्श करायला लावायचा’

माझी आई पोलिस अधिकारी आहे हे मी त्याला सांगितलं. त्यानं मला स्पर्श केला नाही मात्र या भेटीत तो मला विचित्र प्रश्न विचारत राहिला. मी तुला १०० कोटी रुपये दिले तर तू श्वानासोबत सेक्स करशील का असे अनेक विकृत प्रश्न तो मला विचारत होता’ असंही आहाना, एका वृत्तापत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली.

साजिद बरोबरच तिनं अनिर्बन दास ब्लावरही आरोप केले. अनिर्बनचं महिलांप्रती वर्तन हे चुकीचं असतं. माझ्याप्रती अनिर्बनचा उद्देश खूप चुकीचा होता. पण सुदैवानं त्याचा हेतू साध्य झाला नाही, असंही अहाना म्हणली. काही दिवसांपूर्वी लैंगिक गैरवर्तणुकीच्या गंभीर आरोपांमुळे ब्ला यांनी आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 2, 2018 11:56 am

Web Title: sajid khan asked aahana kumra if she would have sex with a dog for rs 100 crore
टॅग : MeToo
Next Stories
1 #HappyBirthdayShahRukhKhan : जेव्हा शाहरुखला वैतागून गौरीने केला होता ब्रेकअप
2 गुगल मॅपवर आता आमिर खान दाखवणार वाट
3 #HappyBirthdaySRK : एकेकाळी थिएटरबाहेर तिकीटं विकणाऱ्या शाहरुखचा बॉलिवूडमधील ‘गॉडफादर’ माहीत आहे का?
Just Now!
X