18 September 2020

News Flash

साजिद नाडियादवालांच्या आगामी दोन चित्रपटात दिसणार अरमान कोहली

२००३ साली आलेल्या 'एलओसी : कारगिल' चित्रपटात शेवटचा दिसलेला अरमान कोहली बऱ्याच काळ मोठ्या पडद्यापासून दूर आहे. असे असले तरी, गेल्या वर्षी 'बिग बॉ़स'मध्ये सहभागी

| December 1, 2014 06:51 am

२००३ साली आलेल्या ‘एलओसी : कारगिल’ चित्रपटात शेवटचा दिसलेला अरमान कोहली बऱ्याच काळ मोठ्या पडद्यापासून दूर आहे. असे असले तरी, गेल्या वर्षी ‘बिग बॉ़स’मध्ये सहभागी झालेल्या अरमानच्या चित्रपटातील अभिनयाच्या कारकिर्दीने अचानक उभारी घेतली आहे. ‘बिग बॉस’नंतर सलमान खानचा अभिनय असलेल्या सुरज बडजात्यांच्या ‘प्रेम रतन धन पायो’ चित्रपटात त्याला खलनायकाची भूमिका मिळाली आहे. आता त्याला साजिद नाडियादवाला यांच्या दोन चित्रपटात भूमिका साकारण्याची संधी मिळाल्याचे समजते. या गोष्टीला अरमानने दुजोरा दिला आहे. नाडियादवाला पाच चित्रपट सुरू करण्याच्या बेतात असून, त्यातल्या दोन चित्रपटात काम करण्यासाठी नाडियादवाला यांनी आपल्याला ऑफिसमध्ये बोलवून विनंती केल्याचे अरमान म्हणाला. अरमानकडे सध्या बऱ्यापैकी चित्रपट चालून येत असले, तरी त्याने याबाबत अधिक माहिती देण्यास नकार दिला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 1, 2014 6:51 am

Web Title: sajid nadiadwala signs armaan kohli for a two film deal
Next Stories
1 अमिताभ बच्चनबरोबर काम करणे सोपे – फरहान अख्तर
2 ‘जज्बा’मध्ये ऐश्वर्या-मनोज वाजपेयी एकत्र!
3 अक्षयच्या ‘बेबी’ची चाहत्यांना उत्सुकता!
Just Now!
X