News Flash

Video : सखी-सुव्रत लंडनमधून करतायत मालिकेचं शूटिंग; असा आहे अनुभव

घरूनच मोबाइलमध्ये केलं शूटिंग

सखी-सुव्रत

करोना व्हायरसच्या संकटामुळे टीव्ही मालिका विश्व ठप्प झाले आहे. मात्र यावर मराठी कलाकार व निर्मात्यांनी मिळून अफलातून पर्याय शोधला आहे. लॉकडाउनमध्ये आपापल्या घरीच मालिकेचं चित्रीकरण केलंय. ‘आठशे खिडक्या नऊशे दारं’ असं या मालिकेचं नाव आहे. याच मालिकेसाठी मराठीतील लोकप्रिय जोडी सखी गोखले आणि सुव्रत जोशी यांनी लंडनहून शूटिंग केलं आहे. शूटिंगचा हा अनुभव कसा आहे, याबद्दल त्यांनी ‘लोकसत्ता ऑनलाइन’ला दिलेल्या या विशेष मुलाखतीत सांगितलं.

चित्रीकरण कसं करायचं याबाबत दिग्दर्शकाने फोनवरून कलाकारांना सूचना दिल्या. करोनामुळे आणखी किती दिवस काम बंद ठेवणार या विचाराने लेखक, दिग्दर्शक श्रीरंग गोडबोले, स्वप्नील मूरकर, मारुती देसाई व इतर कलाकारांनी हा पर्याय शोधला. या मालिकेत काम करणाऱ्या १६ कलाकारांनी अभिनयासह स्वत:च चित्रीकरण, तर दिग्दर्शकाने घरूनच दिग्दर्शन केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 24, 2020 7:08 pm

Web Title: sakhi gokhale and suvrat joshi shooting at home from london watch video ssv 92
Next Stories
1 स्वत:चा चित्रपट टीव्हीवर पाहताना अशी होती सुशांतची प्रतिक्रिया, व्हिडीओ व्हायरल
2 सलमानवर ट्विट करणं अभिनेत्याला पडलं महाग; येतायत पाकिस्तानमधून धमक्या
3 गुलाबबाई संगमनेरकर, मधुवंती दांडेकर यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर
Just Now!
X