News Flash

Birthday Special : साक्षीला व्हायचं होतं पत्रकार,पण…

अभिनेत्री व्हायचंय हे स्वप्नदेखील तिने कधी पाहिलं नव्हतं

साक्षी तन्वर

छोट्या पडद्यावरील ‘कहानी घर घर की’ या मालिकेनंतर अभिनेत्री साक्षी तन्वर ही घराघरात लोकप्रिय झाली. जेवढी लोकप्रियता या मालिकेला मिळाली तितकीच साक्षीलादेखील. त्यामुळे आज एक सेलिब्रिटी स्टारमध्ये तिचं नाव आवर्जुन घेतलं जातं. केवळ छोट्या पडद्यावरच नाही तर साक्षीने काही बॉलिवूड चित्रपटांमध्येदेखील काम केलं आहे. मात्र तिच्या वाट्याला आलेलं हे यश किंवा प्रसिद्धी मिळविण्यासाठी तिला प्रचंड मेहनत करावी लागली. विशेष म्हणजे प्रसिद्धी आणि यश उपभोगत असलेल्या साक्षीला खरंतर या क्षेत्रात करिअर करायचंच नव्हतं. तिने लहानपणापासून करिअरविषयी एक वेगळंच स्वप्न रंगवलं होतं.

१२ जानेवारी १९७३ रोजी राजस्थानमध्ये जन्म झालेल्या साक्षीने दिल्लीतील लेडी श्रीराम कॉलेजमधून महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं. या काळामध्ये अभिनेत्री व्हायचंय हे स्वप्नदेखील तिने कधी पाहिलं नव्हतं. मात्र तिचं नशीब तिला या क्षेत्राकडे घेऊन आलं. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर साक्षी दिल्लीतील ताज पॅलेस हॉटेलमध्ये सेल्स ट्रेनी म्हणून काम करत होती. मात्र तिला प्रत्यक्षात पत्रकार व्हायचं होतं असं तिने एका कार्यक्रमात सांगितलं.

सुरुवातीच्या काळात साक्षीला पत्रकार व्हायचं होतं. मात्र त्याचवेळी तिला छोट्या पडद्यावरील एका कार्यक्रमात काम करण्याची संधी मिळाली. यानंतर साक्षीच्या करिअरला पूर्णपणे वेगळी दिशा मिळाली आणि पत्रकार होण्याचं तिचं स्वप्न अपूर्णच राहिलं.

 

View this post on Instagram

 

Priya Kapoor #WomensWeek ~ #SakshiTanwar #PriyaKapoor #Priya #badeacchelagtehain #SakshiTanwarWorld

A post shared by 4 days to go (@sakshitanwarworld) on

साक्षी ज्यावेळी मास कम्युनिकेशन अॅण्ड एडमिनिस्ट्रेटिव्ह सर्विसेसच्या परिक्षेची तयारी करत होती. त्यावेळी छोट्या पडद्यावरील एका कार्यक्रमासाठी ऑडिशन सुरु असल्याची माहिती तिला मिळाली. त्यानंतर ती या ऑडिशनसाठी गेली आणि तिथे तिची निवड झाली. दरम्यान, या काळात ती मास कम्युनिकेशन अॅण्ड एडमिनिस्ट्रेटिव्ह सर्विसेसची परीक्षा पास होऊ शकली नाही. पण तिला दूरदर्शनवरील टअलबेला सूर मेलाट या कार्यक्रमात काम करण्याची संधी मिळाली. या कार्यक्रमात तिने सह-सूत्रसंचालकाची जबाबदारी पार पाडली होती.

दरम्यान, साक्षीने आतापर्यंत अनेक मालिकांध्ये काम केलं आहे. अभिनेता आमिर खानच्या ‘दंगल’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तसंच सनी देओलच्या ‘मोहल्ला अस्सी’ या चित्रपटातही ती झळकली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 12, 2020 10:00 am

Web Title: sakshi tanwar birthday special kahani ghar ghar ki actress career dreams ssj 93
Next Stories
1 आवाज कोणाचा?
2 ‘कभी ईद कभी दिवाली’
3 पुन्हा कलगीतुरा!
Just Now!
X