22 September 2020

News Flash

‘उगीचच काय भांडायचंय? गोल गोल फिरून पुन्हा, तिथेच का घुटमळायचं?’

सलील कुलकर्णी दिग्दर्शित ‘वेडिंगचा शिनेमा’ १२ एप्रिल रोजी होणार प्रदर्शित

प्रख्यात संगीत दिग्दर्शक डॉ. सलील कुलकर्णी यांचा दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट असलेल्या ‘वेडिंगचा शिनेमा’ची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटाचे दुसरे गाणे “उगीचच काय भांडायचंय? गोल गोल फिरून पुन्हा, तिथेच का घुटमळायच, “उगीचच काय भांडायचंय? नुकतेच प्रदर्शित झाले. हे गाणे चित्रपटाचे दिग्दर्शक सलील कुलकर्णी यांनी लिहिले असून त्यांनीच ते गायले सुद्धा आहे.

आपल्यावर भरपूर प्रेम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसोबत आपण नेहमीच आणि उगीचच भांडत असतो, त्या भांडण्याला कधी काही कारण असते तर कधी काहीच कारण नसते. हेच या गाण्याच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे. पारंपारिक रीतीरिवाज ते आधुनिक फॅड आणि पद्धती यांचा मिलाप हल्ली भारतीय विवाह सोहळ्यांमध्ये पाहायला मिळतो आणि तो संपूर्ण कुटुंबासाठी उत्सवी क्षणांचा मेळावा असतो. बहुचर्चित ‘वेडिंगचा शिनेमा’मध्ये हे सगळे पैलू भरपूर मनोरंजन आणि मसाल्यासह प्रेक्षकांसमोर येणार आहेत. या चित्रपटाचा एक टीझर नुकताच प्रदर्शित झाला होता. त्याला उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. हा चित्रपट १२ एप्रिल २०१९ रोजी महाराष्ट्रभर प्रदर्शित होत आहे.

‘वेडिंगचा शिनेमा’च्या माध्यमातून मराठी संगीत क्षेत्रातील आघाडीचा संगीत दिग्दर्शक सलील कुलकर्णी दिग्दर्शक म्हणून रुपेरी पडद्यावर पदार्पण करत आहे. ‘आयुष्यावर बोलू काही’मधील सलील कुलकर्णी यांचा सहकारी आणि प्रख्यात कवी संदीप खरे यांनी या चित्रपटाची गाणी लिहिली आहेत. “उगीचच काय भांडायचंय? गोल गोल, पुन्हा पुन्हा, तेच तेच, काय बोलायचंय?…” हे गाणेही त्यातीलच एक आहे.

‘वेडिंगचा शिनेमा’मध्ये मुक्ता बर्वे, भाऊ कदम, शिवाजी साटम, अलका कुबल, सुनील बर्वे, अश्विनी काळसेकर, प्रवीण तरडे, संकर्षण कऱ्हाडे, प्राजक्ता हणमगर, योगिनी पोफळे या आघाडीच्या कलाकारांच्या भूमिका आहेत, शिवराज वायचळ आणि ऋचा इनामदार ही नवोदित जोडी या चित्रपटातून पदार्पण करत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 27, 2019 3:56 pm

Web Title: saleel kulkarni directorial debut marathi movie wedding cha shinema new song released
Next Stories
1 Video : शिमगा चित्रपटातील ‘रंग तुझा गंध तुझा’ गाणं प्रदर्शित
2 पहिल्याच फिल्मफेअर फोटोशूटमुळे सारा अली खान ट्रोल
3 Surgical Strike 2: आता बोलती बंद झाली का?; परेश रावलचा पाकिस्तानी कलाकाराला टोला
Just Now!
X