News Flash

मिक्ता २०१५: सलीम खान यांना ‘गर्व महाराष्ट्राचा’ पुरस्कार

कलेच्या प्रांगणातील मानाचा समजला जाणारा 'मराठी इंटरनॅशनल सिनेमा अॅण्ड थिएटर अवाॅर्डस' म्हणजेच 'कलर्स मिक्ता २०१५' सोहळा नुकताच दुबईत मोठ्या थाटात संपन्न झाला.

| February 24, 2015 12:10 pm

salimhelansalma
कलेच्या प्रांगणातील मानाचा समजला जाणारा ‘मराठी इंटरनॅशनल सिनेमा अॅण्ड थिएटर अवाॅर्डस’ म्हणजेच ‘कलर्स मिक्ता २०१५’ सोहळा नुकताच दुबईत मोठ्या थाटात संपन्न झाला. मराठी नाट्य चित्रपटसृष्टीतील प्रतिभावंतांच्या कर्तृत्त्वाची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेणारा हा सोहळा १८ ते २२ फेब्रुवारी दरम्यान रंगला होता. यंदाचा ‘गर्व महाराष्ट्राचा’ हा पुरस्कार सलमान खानचे वडिल कथा-पटकथाकार-लेखक सलीम खान यांना राज ठाकरे यांच्या हस्ते अभिनेते नाना पाटेकर आणि महेश मांजरेकरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. सलीम यांच्या कुटुंबियांच्या उपस्थितीने या सोहळ्याची रंगत आणखीनच वाढली. हा पुरस्कार आपल्यासाठी अभिमानाची बाब असल्याचं सांगत सलीम खान यांनी उपस्थित मराठी रसिकजनांची मने आपल्या हृदयस्पर्शी मनोगताने जिंकून घेतली.
सातासमुद्रापार आपल्या कार्याने वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या दिग्गजांना यावर्षीपासून ‘झेंडा रोविला’ हा पुरस्कार देण्यात आला असून यंदा हा पुरस्कार विख्यात वास्तुरचनाकार अशोक कोरगांवकर यांना देण्यात आला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 24, 2015 12:10 pm

Web Title: salim khan falicited by garv maharashtracha awrd in micta
Next Stories
1 करण जोहरच्या चित्रपटात दिसणार आलिया भट आणि सिध्दार्थ मल्होत्रा
2 आक्षेपार्ह शब्दांची यादी सेन्सॉर बोर्डाने रोखून धरली
3 पाहा: ‘कट्टी बट्टी’ चित्रपटातील कंगना राणावतचा फर्स्ट लूक
Just Now!
X