News Flash

असे तयार झाले ‘चक दे इंडिया’चे गाणे; सलीम-सुलेमान यांनी सांगितला किस्सा

'द कपिल शर्मा शो'मध्ये सलीम-सुलेमान यांनी लावली हजेरी

प्रेक्षकांना खळखळून हसवणारा ‘द कपिल शर्मा शो’ पुन्हा एकदा सुरू झाला आहे. या शोचे नवीन एपिसोड्स प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या शोमध्ये नुकतीच सलीम-सुलेमान या गायक व संगीतकारच्या जोडीने हजेरी लावली होती. सलीम-सुलेमान जोडीने कपिल शर्माच्या शोमध्ये आपली काही सुमधुर गाणी सादर करून कार्यक्रमाला चार चांद लावले. यावेळी त्यांनी ‘चक दे इंडिया’ चित्रपटाच्या पडद्यामागचे गमतीदार किस्सेसुद्धा सांगितले.

‘चक दे इंडिया’चं शीर्षकगीत फक्त प्रेरणादायीच नाही तर थेट मनाला भिडणारं आहे. हे गाणं तयार कसं झालं, यामागची गंमत सलीम-सुलेमान यांनी सांगितली. “चित्रपटाचं नावंच चक दे! इंडिया होतं. त्यामुळे त्याच शब्दाला अनुसरून गाणं तयार करायचं होतं. आम्ही जेव्हा पटकथा ऐकली, तेव्हा आम्हाला हे प्रकर्षाने जाणवलं की या चित्रपटात एका सळसळत्या देशभक्तीपर गीताची फार आवश्यकता आहे. त्यामुळे आम्ही त्या गाण्यावर काम करू लागलो. सुरुवातीला आम्ही तयार केलेलं गीत निर्मात्यांना आवडलं नाही. त्यामुळे आम्ही सात ते आठ वेगवेगळ्या चाली बनवल्या. दुसऱ्यांदा जे गाणं बनवलं, ते खूप दमदार होतं. पण तरीसुद्धा त्यात काहीतरी कमतरता जाणवत होती. एकानंतर एक अनेक चाली नाकारल्या जात होत्या. त्यामुळे हा चित्रपट सोडून द्यावा असं आम्हाला एका क्षणी वाटलं. त्यावेळी सुलेमान म्हणाला.. कोशिश करते है, कुछ करते है… आणि अशा प्रकारे कुछ करिये.. कुछ करिये… हे गीत रचलं गेलं”, असं सलीमने सांगितलं.

आणखी वाचा : धोनीच्या निवृत्तीबाबत सुशांतने दिली होती ‘ही’ प्रतिक्रिया

‘चक दे इंडिया’चं हे शीर्षकगीत प्रचंड गाजलं आणि आजही ते गाणं देशातील प्रत्येक नागरिकाच्या तोंडी आवर्जून ऐकायला मिळतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 16, 2020 5:21 pm

Web Title: salim sulaiman reveal how they composed chak de india on kapil sharma show ssv 92
Next Stories
1 नारायण राणे यांचा गौप्यस्फोट; “सुशांत सिंहची हत्याच, पण…”
2 अभिनयानंतर आर. माधवनचं दिग्दर्शकीय क्षेत्रात पदार्पण; नम्बी नारायण यांचा उलगडणार जीवनप्रवास
3 पुन्हा रंगणार लाल मातीत कुस्तीचा डाव; ‘तालीम 2’ पोस्टर प्रदर्शित
Just Now!
X