८० ते ९०च्या दशकात अनेकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे सलमा आगा. सध्या सलमा आगा यांची मुलगी जारा खान चर्चेत आहे. या चर्चा जाराने पोलिस ठाण्यात सोशल मीडियाद्वारे बलात्काराची धमकी मिळाल्याची तक्रार दाखल केल्यामुळे सुरु झाल्या आहेत. पोलिसांनी या प्रकरणी त्या तरुणीला अटक केली असल्याचे म्हटले जात आहे.
मिड-डेने दिलेल्या वृत्तानुसार, जारा खानने मुंबईमधील ओशिवारा पोलिस ठाण्यात या संदर्भात तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर साराला धमकी देणारी आरोपी तरुणी असल्याचे समोर आले. ही तरुणी हैदराबाद येथे एमबीएचे शिक्षण घेत असून तिचे नाव नूरा सरवर असे असल्याचे समोर आले.
View this post on Instagram
या प्रकरणी तपास सुरु असताना नूरा सरवर या तरुणीचे नाव समोर आले. या तरुणीने फेक अकाऊंट तयार केले होते. ती आणि तिचा को-वर्कर एका राजकिय पक्षासाठी काम करत असून त्यांनी साराला टार्गेट केले होते अशी माहिती पोलिसांनी या संदर्भात मिड-डेला दिली आहे.
साराने काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या अभिनेता अर्जुन कपूरच्या ‘औरंगजेब’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तिने देसी कट्टा या चित्रपटातही काम केले आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 6, 2020 8:21 pm