News Flash

सलमान-फरहान करणार एकत्र काम?

चाहते सलमान आणि फरहानला एकत्र पाहण्यासाठी फार उत्सुक आहेत

सलमान आणि फरहान

बॉलिवूडचा दबंग खान सलमानचे दोन मोठे प्रोजेक्टस ‘भारत’ आणि ‘दबंग ३’ काही दिवसात प्रदर्शित होणार आहेत. त्यानंतर सलमान संजय लीला भन्साळी यांच्या ‘इन्शाअल्लाह’ चित्रपटात दिसणार आहे. आता सलमान आणखी एक चित्रपट करणार असल्याची चर्चा सुरू आहेत.

सलमान चित्रपट दिग्दर्शक, निर्माता फरहान अख्तरसह काम करणार असल्याची चर्चा सुरू आहे. सूत्रांच्या माहितीनुसार फरहान सलमानच्या घरी गेला होता आणि तेथे दोघांमध्ये चित्रपटा विषयी चर्चा देखील झाली. परंतु या चित्रपटाचे फरहान दिग्दर्शन करणार की निर्मिती हे अद्यापसमोर आलेले नाही. तसेच चाहते सलमान आणि फरहानला एकत्र पाहण्यासाठी फार उत्सुक आहेत.

याआधी फरहान ‘डॉन ३’ चित्रपटाच्या कामाला सुरूवात करणार असल्याचे म्हटले जात होते. परंतु याची कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. सलमान आणि फरहानने एकत्र काम केल्यास सलीम-जावेदची दुसरी पीठी एकत्र पाहायला मिळणार आहे. चाहते त्या दोघांना एकत्र पाहण्यासाठी फार आतुर आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 30, 2019 4:45 pm

Web Title: salman and farhan akhtar going to tie up in next movie
Next Stories
1 १९ व्या ‘संस्कृती कलादर्पण गौरव रजनी’ पुरस्काराची नामांकनं जाहीर
2 Video: अमेरिकी दूतावासातील आर्ची, लाल्या, माऊलीची भन्नाट डायलॉगबाजी
3 नेहा पेंडसेवर का होतोय शुभेच्छांचा वर्षाव?
Just Now!
X