News Flash

VIDEO: सलमान, शाहरुख माझ्यापेक्षा मोठे स्टार, त्यांच्यासमोर मी काहीच नाही- आमिर खान

उदाहरण देताना स्वतःची तुलना वेटरशी केल्याने हा व्यवसाय करणा-यांना कमी लेखल्याचे वाटू नये

VIDEO: सलमान, शाहरुख माझ्यापेक्षा मोठे स्टार, त्यांच्यासमोर मी काहीच नाही- आमिर खान

बॉलीवूडवर आमिर, सलमान आणि शाहरुख या तीन खानांचे वर्चस्व असल्याचे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. पण सलमान, शाहरुख हे आपल्यापेक्षा मोठे स्टार असून त्यांच्यासमोर आपण काहीच नसल्याचे वक्तव्य अभिनेता आमिर खानने केले आहे. आगामी दंगल या चित्रपटाच्या पोस्टर लॉन्चवेळी आमिर याबाबत बोलत होता.
आमिर म्हणाला की, शाहरुख, सलमानची एण्ट्री होते तेव्हा स्टार आले आहेत असे वाटते. पण माझी एण्ट्री होते तेव्हा वेटर आल्यासारखे वाटते. आपल्या या वक्तव्याचा कोणताही विपर्यास होऊ नये म्हणून त्यानंतर आमिरने सदर वक्तव्याबाबत लगेच माफीदेखील मागितली. कारण यात त्याने उदाहरण देताना स्वतःची तुलना वेटरशी केल्याने हा व्यवसाय करणा-यांना कमी लेखल्याचे वाटू नये असा त्याचा उद्देश होता. पुढे तो म्हणाला की, जे लाखो लोक सुलतान बघायला येतील त्यांनी दंगलचा पोस्टर पाहावा. जेणेकरून असाही चित्रपट येतोय हे त्यांना कळेल.
पोस्टर लॉन्चवेळी आमिरला बरेच प्रश्न विचारण्यात आले. त्यावेळी सलमान तुझ्यापेक्षा मोठा स्टार आहे असे सूचित केले असता आमिरने ही गोष्ट सकारात्मक दृष्टीने घेतली. तो म्हणाला की, सलमान नेहमीच माझ्यापेक्षा मोठा स्टार राहिला आहे. यात नवीन काय आहे? मी नेहमीच त्याला मोठा स्टार मानत आलो आहे. अमिताभ बच्चन, शाहरुख हे माझ्यासाठी मोठेचं स्टार आहेत. असे अनेक कलाकार आहेत जे मोठे स्टार आहेत. हृतिक रोशन, अजय देवगण, रणवीर, रणबीर हे सर्व मोठे स्टार आहेत. या सर्वांची लोकप्रियता अफाट आहे. प्रसिद्धीत कोण पुढे आहे आणि कोण मागे हे ठरवणे कठीण आहे, असे आमिर म्हणाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 4, 2016 5:00 pm

Web Title: salman and shah rukh bigger stars than me i am a nobody aamir khan
Next Stories
1 ‘दंगल’ नाव सलमानने दिले… आमिरची कबुली!
2 ‘आर्ची’ने उलगडले ‘रिंकू’ नावाचे रहस्य
3 Salman khan: सलमानचे वक्तव्य दुर्देवी आणि असंवेदनशील- आमिर खान
Just Now!
X