News Flash

‘हाय मेरा बच्चा…’, सलमानचा व्हिडीओ पाहून सुष्मिताने दिला रिप्लाय

सलमान खानने व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना 'आर्या' ही वेब सीरिज पाहण्याचे आवाहन केले होते

काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनची ‘आर्या’ ही वेब सीरिज प्रदर्शित झाली आहे. सुष्मिताने या सीरिजमधून कम बॅक केला. तसेच या सीरिजमध्ये सुष्मिताने आतापर्यंत साकारलेल्या भूमिकांपेक्षा थोडी वेगळी भूमिका साकारली आहे. बॉलिवूड अभिनेता सलमान खानने व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना ‘आर्या’ ही वेब सीरिज पाहण्याचे आवाहन केले होते. आता सुष्मिताने सलमानला रिप्लाय दिला आहे.

सुष्मिताने तिच्या अनोख्या अंदाजात सलमानला उत्तर दिले आहे. “पहिले तर मी माझा एक डॉयलॉग बोलू इच्छिते ‘हाय मेरा बच्चा’ सलमान तुझे मनापासून आभार. माझे तुझ्यावर प्रचंड प्रेम आहे” असे सुष्मिताने पुढे म्हटले आहे.

यापूर्वी सलमानने ५५ सेकंदाचा व्हिडीओ पोस्ट करत सुष्मिताची प्रशंसा केली होती. ‘आर्याचे स्वागत तर करा… एकमद वेगळ्या प्रकारे कमबॅक केला आहे आणि शो देखील वेगळा आहे. सुष्मिता सेन तुझे अभिनंदन’ असे सलमानने ट्विटमध्ये म्हटले होते. त्याला त्याच्या या ट्विटमुळे सोशल मीडियावर ट्रोल देखील करण्यात आले.

‘आर्या’ ही सुश्मिताची पहिलीच वेबसीरिज आहे. तसेच यामध्ये खूप दिवसांनी अभिनेता चंद्रचूड सिंह दिसणार आहे. शिवाय नमित दास, मनिष चौधरी आणि सिकंदर खेरचीही यामध्ये महत्त्वाची भूमिका आहे. सुष्मिताला अनोख्या अंदाज पहिल्यानंतर सोशल मीडियावर सीरिजच्या जोरदार चर्चा सुरु आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 28, 2020 6:15 pm

Web Title: salman appreciates sushmita aarya actress respond in adorable manner avb 95
Next Stories
1 Video : ‘कोऱ्या पुस्तकांचा वास म्हणजे शाळेचा पहिला दिवस’, बेला शेंडे सांगतायेत शाळेच्या आठवणी
2 “सलमानला खरंच कलाकार म्हणावं का?”; Wikipedia पेज पोस्ट करुन अभिनेत्याने उडवली खिल्ली
3 Video: डान्स करता करता शाहरुखने केले काजोलला किस, व्हिडीओ व्हायरल
Just Now!
X