अभिनेता सलमान खानचा आगामी ‘रेस ३’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत असल्यामुळे सलमानने त्याचा मोर्चा अन्य प्रोजेक्ट्सकडे वळविला आहे. सध्या सलमानने त्याचं लक्ष छोट्या पडद्यावरील ‘दस का दम’ या रिअॅलिटी शोकडे वळविले असून तो या शोच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहे. काही दिवसांपूर्वीच ‘दस का दम’ चा पहिला भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला. या भागात एका स्पर्धकानेच सलमानवर गुगली टाकल्याचे पाहायला मिळाले. यावेळी सलमानने दिलेल्या उत्तरामुळे हा भाग फार गाजला होता. मात्र आता हा शो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

सलमान त्याच्या अभिनयाबरोबरच उदार व्यक्तीमत्वामुळेही ओळखला जातो. कायम अडचणीत असलेल्यांना सलमानने आतापर्यंत मदतीचा हात पुढे केला आहे. सलमानच्या याच स्वभावाचा प्रत्यत पुन्हा एकदा आला असून यावेळी त्याने एका लहान मुलीच्या शिक्षणाचा खर्च उचलला आहे.

‘दस का दम’ या शोमध्ये अनेक स्पर्धेक भाग घेत असतात. या कार्यक्रमामध्ये स्पर्धेकांना ना ना त-हेचे प्रश्न विचारण्यात येतात. विचारलेल्या प्रश्नाची अचूक उत्तरे देणा-या विजेत्या स्पर्धकाला एक ठराविक रक्कम बक्षीस म्हणून देण्यात येते. त्यामुळेच या शोमध्ये कोलकाताच्या पिंकी शाह या महिलेने भाग घेतला होता. मात्र ती या कार्यक्रमात यशस्वी ठरली नाही. तिला केवळ २० हजार रुपयेचं जिंकता आले. पिंकीला या शोमधून माघार घ्यावी लागल्यामुळे तिला  शोच्या सेटवरच रडू कोसळले. पिंकी रडायला लागल्यामुळे सलमानने पिंकीला त्यामागचे कारण विचारल्यावर तिला मुलीच्या शिक्षणाची चिंता असल्याचे तिने सांगितले. यावर तोडगा काढत तिच्या मुलीच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च उचलण्यास तयार असल्याचे सलमानने सांगितले.

#salmankhan melts out heart with this incident @sonytvofficial #duskadum

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

‘यापुढे मुलीच्या शिक्षणाची काळजी करण्याची गरज नाही. तिला जितकं शिकायचं आहे तितकं शिकू दे. तिच्या संपूर्ण शिक्षणाचा खर्च मी स्वत: उचलेन’, असं सलमानने सांगितलं. सलमानच्या या आश्वासनानंतर पिंकीच्या डोळ्यातून आनंदाश्रू बाहेर पडले आणि ती पटकन सलमानच्या पाया पडली.

पिंकीच्या घरची परिस्थिती बेताची असून ती एका खासगी कंपनीत काम करते. मात्र मासिक वेतन कमी असल्यामुळे तिला घरखर्च चालविणे अवघड जाते. यातच तिच्या डोक्यावर मुलीच्या शिक्षणाचा भार आहे. मुलीला चांगले शिकता यावे यासाठी पिंकी दिवसरात्र मेहनत करत असते.मात्र आर्थिक समस्यांमुळे ग्रासलेल्या पिंकीला यातून मार्ग काढता येत नव्हता यासाठी तिने ‘दस का दम’ या कार्यक्रमामध्ये भाग घेतला होता.