13 July 2020

News Flash

सलमान घेणार हाती झाडू!

मी आणि माझे फाऊंडेशन बिइंग ह्युमन हे मोदींचे आवाहन स्वीकारत आहोत. मी स्वच्छ भारत अभियानासाठी पूर्णपणे सहकार्य करेन

| October 6, 2014 10:02 am

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नऊ सेलिब्रेटींना स्वच्छ भारत अभियानात सहभागी होण्याचे आवाहन २ ऑक्टोबरला गांधी जयंती दिवशी केले होते. दरम्यान, मास्टर ब्लास्टर सचिनने तेंडुलकरला याचे नेतृत्व सोपविण्यात आले असून त्याने या कार्यास रविवारी पहाटे साडेचार वाजता सुरुवातही केली. आवाहन करण्यात आलेल्या नऊ सेलिब्रेटींमध्ये बॉलीवूड दबंग खान सलमानचाही समावेश आहे. सलमानने मोदींचे आवाहन स्वीकारले असून तसे त्याने ट्विटही केले. मी आणि माझे फाऊंडेशन बिइंग ह्युमन हे मोदींचे आवाहन स्वीकारत आहोत. मी स्वच्छ भारत अभियानासाठी पूर्णपणे सहकार्य करेन, असे त्याने ट्विट केले.स्वच्छ भारत अभियान जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी सोशल मिडियाचीही मदत मोदींनी घेतली आहे. #MyCleanIndia हा हॅशटॅग ट्विटवर सध्या सुरु आहे. तसेच, साफ करण्यात आलेल्या जागेचा व्हिडिओ आणि छायाचित्रे प्रदर्शित करण्यास मोदींनी सांगितले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 6, 2014 10:02 am

Web Title: salman khan accepts clean india invite from prime minister narendra modi
Next Stories
1 ‘सत्यमेव जयते ३’च्या पहिल्या भागात खेळांविषयी चर्चा
2 करण-अर्जुन एकत्र येणे अशक्यच- सलमान
3 आमीरला ‘मुन्नाभाई’मधला ‘सरकीट’ साकारण्याची इच्छा?
Just Now!
X