News Flash

सलमान खान म्हणाला, “मी खूप चुका केल्या, पण माफी देखील मागितली आहे….”

"आपल्याकडून झालेल्या चुका कबुल करणं हे खूप अवघड असतं. प्रत्येक जण हे करू शकत नाही. मी सुद्धा त्यातलाच एक आहे."

बॉलिवूडचा ‘दबंग’ अभिनेता सलमान खान नुकतंच कबीर बेदी यांच्यासोबत लाइव्ह आला होता. या लाइव्ह सेशनमध्ये कबीर बेदी यांनी ऑटोबायोग्राफी ‘Stories I Must Tell: The Emotional Life of an Actor’ यावर सलमान खानसोबत बोलताना दिसून आले. यावेळी सलमान खानने आतापर्यंत त्याच्या आयुष्यात अनेक चुका केल्या असल्याची कबूली दिली.

सलमान खान म्हणाला, “माझ्या चुकांवर मी माफी मागितली”

या लाइव्ह सेशनमध्ये अभिनेते कबीर बेदींनी त्यांच्याकडून झालेल्या चुकांचा उल्लेख केला. यावेळी सलमान खान म्हणाला, “आपल्याकडून झालेल्या चुका कबुल करणं हे खूप अवघड असतं. प्रत्येक जण हे करू शकत नाही. मी सुद्धा त्यातलाच एक आहे. माझी चूक नाही, हे मी आधी खूपदा म्हणत होतो. पण जेव्हा तुम्ही असं म्हणता की, “होय, माझ्याकडून चूक झाली आहे”. अशाच प्रकारे मी स्वतः माझ्यामध्ये बदल करण्याचे प्रयत्न केले. आपण केलेल्या चुका स्विकार करण्यासाठी सुद्धा खूप मोठी हिंमत लागते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kabir Bedi (@ikabirbedi)


यापुढे बोलताना सलमान खान म्हणाला, “कित्येक वेळा माझ्याकडून खूप चुका झाल्या आहेत. त्या प्रत्येक वेळी मी माझ्या चुका स्विकार करत आलो आहे. चुका प्रत्येकाकडूनच होतात, पण एकच चुक पुन्हा झाली नाही पाहिजे.” यापुढे बोलताना अभिनेता सलमान खान म्हणाला, “जेव्हा आपण एखादं पुस्तक लिहायला घेतो त्यावेळी स्वतःच्या आत्माचं परिक्षण करण्यासाठी खूप मोठी हिंमत लागते. जेव्हा तुम्ही पुस्तक लिहायला घेता तेव्हा काही गोष्टी लिहू की नको लिहू, असा विचार मनात येतोच. त्यावेळी तुम्हाला स्वतःशी प्रामाणिक असावं लागतं. इतरांसोबत सुद्धा तितकंच प्रामाणिक राहणं गरजेचं असतं. केवळ आपल्यासोबत जे जे घडतंय, ते सर्व सत्यच लिहायचंय, हे मनाशी पक्क करावं लागतं.”

कबीर बेदी गेल्या काही दिवसांपासून आपल्या बायोग्राफीमुळे चर्चेत आले आहेत. यात कबीर बेदी यांनी त्यांचं लग्न आणि रिलेशनशीपवर मनमोकळ्यापणाने बोलले. कबीर बेदी फिल्म इंडस्ट्रीमधील दिग्गज कलाकार आहेत. त्यांच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये बरेच सुपरहिट चित्रपट दिले आहेत. कबीर बेदी यांनी टीव्ही इंडस्ट्रीत देखील काम केलंय.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 25, 2021 7:01 pm

Web Title: salman khan admits his mistakes in chat with kabir bedi said this prp 93
Next Stories
1 ५३ वर्षीही ‘फिट’ असलेल्या किशोरी शहाणेंचा हा व्हिडिओ पाहिलात का?
2 रणबीर कपूर आहे तैमूरचा चाहता
3 अखेर ५५ दिवसांनंतर अनिरुद्ध देवेला मिळाला डिस्चार्ज, केली करोनावर मात
Just Now!
X