News Flash

दिशाला खरोखर किस केलं का?; सलमानने केला खुलासा

जाणून घ्या काय म्हणाला सलमान...

गेल्या वर्ष भरापासून बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच्या ‘राधे : युअर मोस्ट वाँटेड भाई’ या बहुचर्चित चित्रपटाची चाहते प्रतिक्षा करत होते. चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असल्याने चाहत्यांची उत्सुकता ही शिगेला पोहोचली आहे. या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. मात्र, ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर सर्वाधिक चर्चा ही सलमान आणि दिशा पटाणीच्या किसिंग सीनची होती. सलमान कधीच किसिंग सीन करत नाही हे आपल्या सगळ्यांना ठावूक आहे. त्यात आता सलमानने हा किसिंग सीन खरा असल्याचे म्हटले आहे. त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हा व्हिडीओ दिशाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओत ‘राधे’ची संपूर्ण टीम ही त्यांच्या प्रवासाबद्दल सांगताना दिसत आहे.  यावेळी चित्रपटात असलेल्या किसिंग सीनवर सलमानने प्रतिक्रिया दिली आहे. “चित्रपटात एक किसिंग सीन आहे. मी दिशासोबत हा सीन केला आहे. पण, मी दिशाला किस केलेलं नाही. तर, सेलोटेपवर किस केलं आहे,” असं सलमान त्या व्हिडीओमध्ये म्हणाला.

सलमान खान ऑनस्क्रीन किस करत नाही हे तर सर्वांनाच माहीत आहे. सलमानने आजवर कोणत्याही चित्रपटात किसिंग सीन दिलेला नाही. सलमानने यापूर्वी एका मुलाखतीमध्ये म्हटले होते लाजाळू स्वभावामुळे तो इंटिमेट आणि किसिंग सीन देत नाही. पण आता ‘राधे’ चित्रपटात पहिल्यांदाच सलमानने किसिंग सीन दिल्यामुळे चर्चा रंगल्या होत्या.

सलमान आणि दिशाने यापूर्वी ‘भारत’ या चित्रपटात एकत्र काम केले होते. चित्रपटाचं दिग्दर्शन हे प्रभू देवाने केलं आहे. हा चित्रपट १३ मे रोजी प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, सलमान आणि दिशा व्यतिरिक्त जॅकी श्रॉफ आणि रणदीप हुड्डा हे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 2, 2021 2:16 pm

Web Title: salman khan admits kissing disha patani in radhe but revealed theres a twist watch video dcp 98
Next Stories
1 Assembly Election Results 2021: “दाढी करा आणि जे केलंय ते निस्तरायला सुरुवात करा”- प्रकाश राज यांचा टोला
2 अभिनेता अनिरुद्धची प्रकृती गंभीर, २ महिन्याच्या मुलाला सोडून पतीकडे आली पत्नी
3 Assembly Election Results 2021: “अजून एक काश्मिर तयार होत आहे” -अभिनेत्री कंगना रणौत
Just Now!
X