बॉलिवूडचा भाईजान सलमान खान वर्षातून एक किंवा दोनच चित्रपटात काम करतो परंतु तरीही तो वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा अभिनेता ठरतो. त्याच्या तुलनेत इतर कलाकार तीनपेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम करुनही त्यांना सलमान इतकी कमाई करता येत नाही. परंतु २०१९ हे वर्ष गाजवले ते बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारने. त्याने सलग चार सुपरहिट चित्रपटांमधून तब्बल ७०० कोटी रुपयांची कमाई केली.

‘हा’ ठरला वर्षातील सर्वोत्कृष्ट अभिनेता

गेल्या वर्षभरात अक्षयने ‘मिशन मंगल’, ‘हाऊसफुल’, ‘केसरी’, आणि ‘गुड न्यूज’ या चार चित्रपटांत काम केले होते. ‘मिशन मंगल’ हा भारताने यशस्वीरित्या मंगळ ग्रहावर पाठवलेल्या मंगळ यानावर आधारित चित्रपट होता. तर ‘हाऊसफुल’ व ‘गुड न्यूज’ हे दोन विनोदीपट होते. या चार चित्रपटांमधून अक्षय कुमारने एकूण ७०० कोटी रुपयांची कमाई केली.

“माझ्या ‘किरण’वर बनवला चित्रपट”; सलमाननं शाहरुखवर केला आरोप

यापूर्वी २०१५ साली सलमान खानने एका वर्षात तब्बल ५०० कोटी रुपयांची कमाई केली होती. त्याने ‘बजरंगी भाईजान’मधून ३०० कोटी २० लाख तर ‘प्रेम रतन धन पायो’मधून २०० कोटी १० लाख रुपयांची कमाई केली होती. एखाद्या कलाकाराने केलेला हा बॉलिवूडमधील आजवरचा सर्वाधिक कमाईचा विक्रम होता. परंतु गेल्या वर्षात अक्षय कुमारने आश्चर्यचकित कमाई करुन सलमानला मागे टाकले.