News Flash

सलमानने किसिंग सीनमुळे सोडलेल्या ‘इंशाअल्लाह’वर आलियाने सोडले मौन

'इंशाअल्लाह'च्या निमित्ताने आलिया व सलमान पहिल्यांदाच एकत्र काम करताना दिसणार होते

सलमानने किसिंग सीनमुळे सोडलेल्या ‘इंशाअल्लाह’वर आलियाने सोडले मौन

बॉलिवूडचा भाईजान म्हणजेच सलमान खान याचा ‘इंशाअल्लाह’ हा चित्रपट गेल्या काही दिवसांत सातत्याने चर्चेत आहे. या चित्रपटात आलिया भट्ट आणि सलमान खान प्रमुख भूमिकेत होते. परंतु हा चित्रपटच आता रद्द करण्याचा निर्णय दिग्दर्शक संजय लीला भंन्साळी यांनी घेतला आहे.

अभिनेता सलमान खान ५३ व आलिया २६ वर्षांची आहे. त्यामुळे मुख्य कलाकारांच्या वयातील अंतरामुळे हा चित्रपट खुपच चर्चेत होता. तसेच ‘इंशाअल्लाह’च्या निमित्ताने आलिया व सलमान पहिल्यांदाच एकत्र काम करताना दिसणार त्यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता होती. मात्र बऱ्याच तर्कवितर्कानंतर अखेर हा चित्रपट गुंडाळण्यात आला.

अनेकांच्या मते या चित्रपटात द्याव्या लागणाऱ्या एका किसिंग सीनमुळे सलमानने चित्रपटात काम करण्यास दिला. दरम्यान या चित्रपटाबाबत प्रथमच आलियाने मौन सोडले आहे.

“मी संजय लीला भन्साळी आणि सलमान खान यांच्यासोबत काम करण्यास उत्सुक होते. अनेकदा काही गोष्टी अनपेक्षितपणे घडतात. त्या गोष्टींवर आपले नियंत्रण नसते. अनेकदा योग्य पद्धतीने नियोजन केल्यानंतरही गोष्टी ठरवल्याप्रमाणे होत नाहीत. ‘इंशाअल्लाह’च्या बाबतीतही हेच झाले. असे आलिया आयफा २०१९ पुरस्कार सोहळ्यात पत्रकारांना दिलेल्या मुलाखतीत म्हणाली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 19, 2019 8:16 pm

Web Title: salman khan alia bhatt inshallah mppg 94
Next Stories
1 “अभिनेत्रींसाठी न्यूड सीन देण्याशिवाय आता गत्यंतर नाही”
2 हृतिकसोबतच्या या मुलाला ओळखलंत का?; आता आहे तरुणाईच्या गळ्यातील ताईत
3 सैफ विसरला पतौडी पॅलेसचा रस्ता अन्..
Just Now!
X