News Flash

अभिषेकच्या सर्वांत आवडत्या रोमॅण्टिक चित्रपटात सलमान- ऐश्वर्याची जोडी

आजही सलमान- ऐश्वर्याचं नाव एकत्र आल्यावर अनेकांच्या भुवया उंचावतात.

अभिषेकच्या सर्वांत आवडत्या रोमॅण्टिक चित्रपटात सलमान- ऐश्वर्याची जोडी

बॉलिवूडची सर्वात सुंदर जोडी म्हणून ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्याकडे पाहिलं जातं. त्यांची ऑनस्क्रिन केमिस्ट्रीसुद्धा अनेकांना आवडते. अभिनेता सलमान खान आणि ऐश्वर्या यांच्यात आता कोणतेच संबंध नाहीत. तरी आजही या दोघांचे नाव एकत्र आल्यावर अनेकांच्या भुवया उंचावतात. विशेष म्हणजे अभिषेकमुळेच या दोघांचं नाव सध्या चर्चेत आहे.

एका चॅट शोमध्ये अभिषेकला कोणता रोमॅण्टिक चित्रपट सर्वांत जास्त आवडतो असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नावर अभिषेकने दिलेलं उत्तर अनेकांनाच थक्क करणारं आहे. ‘हम दिल दे चुके सनम’ हा चित्रपट सर्वाधिक आवडत असल्याचं त्याने सांगितलं. विशेष म्हणजे या चित्रपटात सलमान आणि ऐश्वर्याने एकत्र काम केलं होतं. ‘मला हम दिल दे चुके सनम हा चित्रपट फार आवडतो. मला आजही आठवतंय, त्यावेळी मी आणि बेबो (करिना कपूर) ‘रेफ्युजी’ चित्रपटासाठी तयारी करत होतो आणि त्यावेळी मी हा चित्रपट पाहिला होता,’ असं अभिषेक म्हणाला. ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानच सलमान- ऐश्वर्याच्या अफेअरविषयी चर्चांना उधाण आलं होतं.

#MeToo : बिग बींच्या मौनाबाबत तनुश्री म्हणते..

ऐश्वर्याची मुख्य भूमिका असलेले कोणते चित्रपट आवडतात असाही प्रश्न अभिषेकला या चॅट शोमध्ये विचारण्यात आला. त्यावर ‘हम दिल दे चुके सनम’, ‘गुरु’ आणि ‘जोधा अकबर’ या चित्रपटांची नावं अभिषेकने सांगितली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 23, 2018 5:28 pm

Web Title: salman khan and aishwarya rai star in abhishek bachchan favourite film
Next Stories
1 ‘तुला पाहते रे’ फेम जयदीप या सुप्रसिद्ध अभिनेत्याचा मुलगा
2 #MeToo : बिग बींच्या मौनाबाबत तनुश्री म्हणते..
3 शनायासाठी काय पण, एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी
Just Now!
X