News Flash

सलमान- कतरिनाच्या ब्रेकअपचा ‘या’ अभिनेत्रीला झाला सर्वाधिक फायदा

सलमान- कतरिनाचे ब्रेकअप होण्याआधीच्या काही भेटी फार खास होत्या

सलमान खान आणि कतरिना कैफ

बॉलिवूड स्टार डेजी शाहला सुपरस्टार सलमान खानने बॉलिवूडमध्ये पहिला ब्रेक दिला. तिच्या बॉलिवूड पदार्पणाबद्दल अनेक गोष्टी बोलल्या जातात. पण तुम्हाला माहित आहे का की डेजीच्या बॉलिवूड पदार्पणामध्ये कतरिना कैफचाही फार मोठा हात आहे. सलमान आणि कतरिनाच्या ब्रेकअपबद्दल सारेच जाणतात. सलमान- कतरिनाच्या आयुष्यातील हे एक असे रहस्य आहे ज्याबद्दल दोघंही कधीच खुलेपणाने बोलणार नाहीत. आज भलेही त्यांच्यात सारे काही आलबेल असेल. पण एक वेळ अशी होती की या दोघांमध्ये काहीच चांगले नव्हते.

स्पॉटबॉयने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, सलमान आणि कतरिनाचे ब्रेकअप होण्याआधीच्या काही भेटी फार खास होत्या. सलमानने कतरिनाला सांगितले होते की, आज त्याच्यामुळेच ती स्टार झाली आहे. यावर उत्तर म्हणून तिने सांगितले की, तिच्यातल्या टॅलेंटमुळे ती आज स्टार झाली. एवढंच बोलून कतरिना थांबली नाही तर पुढे ती म्हणाली की, एवढंच असेल तर त्याने कोणालाही स्टार करुन दाखवावं… कतरिनाच्या या वक्तव्यावर सलमानने बॅकग्राऊंड डान्सरला स्टार करण्याचे आव्हान स्वीकारले.

याच दरम्यान गणेश आचार्यच्या ग्रुप डान्समध्ये काम करत असलेल्या डेसीवर सलमानची नजर पडली. तिला पाहताचक्षणी सलमानने तिला स्टार करण्याचा निर्णय घेतला. सलमानने डेजीला प्रत्येक गोष्ट शिकवली जी बॉलिवूडमध्ये टिकण्यासाठी फार आवश्यक आहे. काही महिन्यांनंतर डेजीने सलमानच्या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 24, 2018 5:32 am

Web Title: salman khan and katrina kaif made daisy shah career
Next Stories
1 शब्दांच्या पलिकडले : …कभी अलविदा ना कहना
2 ‘शेप ऑफ वॉटर’ला ऑस्करची १३ नामांकने
3 भन्साळींच्या ‘पद्मावत’ला मनसेचे सुरक्षा कवच
Just Now!
X