सलमान खान आणि कतरिना कैफ यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘टायगर जिंदा है’ सिनेमा २२ तारखेला देशभरात प्रदर्शित होणार आहे. जगभरात या दोन सुपरस्टार्सचे चाहते असल्यामुळे हा सिनेमा परदेशातही प्रदर्शित करण्यात येणार आहे. पण पाकिस्तानातील ‘भाईजान’च्या चाहत्यांना मात्र हा सिनेमा पाहण्यासाठी काही दिवस थांबावे लागणार आहे. पाकिस्तान सेन्सॉर बोर्डाने या सिनेमाला अजूनपर्यंत हिरवा कंदिल दिलेला नाही.

https://www.instagram.com/p/BbyiSADA5Xs/

पाकिस्तानमध्ये सिनेमा प्रदर्शित करण्याचे सगळे हक्क ‘जियो’ फिल्म्सकडे आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार पाकिस्तानचे माहिती व प्रसारण मंत्रालय आणि राष्ट्रीय इतिहास आणि साहित्य संवर्धन मंडळाने सेन्सॉर बोर्डाच्या सांगण्यावरून चित्रपटाला ना हरकत प्रमाणपत्र अजुनपर्यंत दिलेले नाही. पण त्यांनी हा सिनेमा पाकिस्तानात प्रदर्शितच होऊ देणार नाही, असेही जाहीर केलेले नाही. त्यामुळे भाईजानचे चाहते लवकरात लवकर हा सिनेमा पाकिस्तानात प्रदर्शित व्हावा, याचीच वाट पाहत आहेत.

https://www.instagram.com/p/BcNP3WIgZES/

अली अब्बास जफर दिग्दर्शित हा सिनेमा २०१२ मध्ये आलेल्या ‘एक था टायगर’ सिनेमाचा सिक्वल आहे. या सिनेमाची कथा जिथे संपली होती तिथूनच ‘टायगर जिंदा है’ची कथा सुरू होणार आहे. पाच वर्षांनी सलमान- कतरिना ही हीट जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहता येणार आहे.

https://www.instagram.com/p/BcewpgpAXXC/