20 September 2020

News Flash

अखेर चाहत्यांना पाहायला मिळणार सलमान-कतरिनाचं लग्न

या दोघांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री चाहत्यांना आवडते.

सलमान खान, कतरिना कैफ

सलमान खान आणि कतरिना कैफ ही जोडी आजही प्रेक्षकांना फार आवडते. या दोघांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री चाहत्यांना भावते. ‘टायगर जिंदा है’, ‘एक था टायगर’ यानंतर आता आगामी ‘भारत’ या चित्रपटातून ही जोडी पुन्हा एकदा एकत्र झळकणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या निमित्ताने सलमान – कतरिनाच्या चाहत्यांना आता ऑनस्क्रीन त्यांचं लग्न पाहायला मिळणार आहे.

‘भारत’ या चित्रपटात सलमान आणि कतरिनाचं लग्न शूट करण्यात येईल. एका गाण्यात हा ‘वेडिंग सिक्वेन्स’ दाखवण्यात येणार आहे. त्यासाठी सध्या शूटिंगची जोरदार तयारी सुरु आहे. त्यामुळे ऑफस्क्रीन नाही तरी ऑनस्क्रीन तरी चाहत्यांना त्यांच्या आवडत्या जोडीचं शुभमंगल होताना पाहायला मिळणार आहे.

वाचा : ‘भाई’ चित्रपटावरील आरोपांबाबत महेश मांजरेकर म्हणतात..

‘भारत’मध्ये सलमान, कतरिनासोबतच सुनील ग्रोवर, दिशा पटानी यांच्याही भूमिका आहेत. २०१४ साली प्रदर्शित झालेल्या “Ode To My Father” दक्षिण कोरियन चित्रपटावर भारत आधारलेला आहे. या चित्रपटात रशियन सर्कस आणि अन्य काही साहसी दृश्य पाहायला मिळणार आहेत. अली अब्बास जफर दिग्दर्शित ‘भारत’ हा चित्रपट त्याच्या कथानकासाठी विशेष चर्चेत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 2, 2019 6:24 pm

Web Title: salman khan and katrina kaif to shoot a wedding number for upcoming movie bharat
Next Stories
1 ‘भाई’ चित्रपटावरील आरोपांबाबत महेश मांजरेकर म्हणतात..
2 रिअॅलिटी शो स्पर्धक ते आघाडीची बॉलिवूड गायिका; असा आहे भूमी त्रिवेदीचा यशस्वी प्रवास
3 रिलेशनशिप थीमवर रंगणार महाराष्ट्राची हास्य जत्रा
Just Now!
X