16 January 2021

News Flash

वडिलांसह सलमानची रंगली मैफिल, पाहा व्हिडीओ

सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे

बॉलिवूडचा दबंग खान सलमान आणि सलीम खान या दोघांमध्ये वडिल मुलापेक्षा मैत्रीचे नाते असल्याचे पाहायला मिळते. बऱ्याच वेळा सलमान आणि सलीम एकत्र कार्यक्रमांमध्ये हजेरी लावताना देखील दिसतात. नुकताच सलमानने त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सलमानने नुकताच त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सलमान आणि सलीम ही बाप-लेकाची जोडी मोहम्मद रफी यांचे ‘सुहानी रात ढल चुकी है’ हे गाणे गात आहेत. सलमानने व्हिडीओ शेअर करत ‘आमच्या परिवाराचे सुलतान, टायगर, भारत… गाणे गात आहेत’ असे कॅप्शन दिले आहे.

सोशल मीडियावर सतत सक्रिय असणाऱ्या सलमानचा काही दिवसांपूर्वी स्वीमिंगपूलमध्ये बॅक फ्लिप मारतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. सध्या सलमान त्याचा आगामी चित्रपट ‘दबंग ३’ च्या चित्रीकरणात व्यग्र आहे. या चित्रपटात सलमानसह अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्यानंतर सलमान संजय लीला भन्साली यांच्या ‘ईन्शाल्ला’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात सलमान आणि आलिया पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 26, 2019 11:56 am

Web Title: salman khan and salim khan singing suhani rat hai video viral avb 95
Next Stories
1 अटक प्रकरण पथ्यावर, बिचुकलेंनी महेश मांजरेकरांनाही टाकलं मागे
2 रणबीरसोबतच्या नात्याला आलिया म्हणते ‘नजर ना लगे’, कारण…
3 दबंग सलमान खानची पत्रकाराला मारहाण, तक्रार दाखल
Just Now!
X