News Flash

सलमान आणि शिल्पाचा ‘चांद छुपा बादल में’वर रोमँटीक अंदाज, व्हिडीओ व्हायरल

हा जुना व्हिडीओ पुन्हा व्हायरल होत आहे.

बॉलिवूडचा भाईजान सलमान खान आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. त्यांची ऑनस्क्रिन केमिस्ट्री चाहत्यांना विशेष आवडत होती. आता त्या दोघांचा जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी ‘हम दिल दे चुके’ या हिट चित्रपटातील ‘चांद छुपा बादल में’ गाण्यावर डान्स केला आहे.

सलमान आणि शिल्पाचा ‘चांद छुपा बादल में’ गाण्यावरील रोमँटीक अंदाज पाहण्यासारखा आहे. सध्या सोशल मीडियावर जुन्या व्हिडीओंचा ट्रेंड आहे. त्यामुळे सेलिब्रिटींचे अनेक जुने व्हायरल होताना दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

#salmankhan #shilpashetty

A post shared by “” (@salmankhanazerbaijan) on

सलमना आणि शिल्पाचा हा व्हिडीओ एका पुरस्कार सोहळ्यातील आहे. एका फॅन पेजने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. चाहत्यांनी या व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.

‘शादी करके फस गया’, ‘फिर मिलेंगे’, ‘अवजार’, ‘गर्व’ अशा अनेक चित्रपटांमध्ये सलमान आणि शिल्पाने एकत्र काम केले होते. त्यावेळी त्यांची जोडी हिट ठरली होती. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये त्यांना पुन्हा एकदा एकत्र पाहून चाहत्यांना आनंद झाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 15, 2020 12:10 pm

Web Title: salman khan and shilpa shetty dance on chand chhupa badal mein avb 95
Next Stories
1 Bigg Boss 14 : ‘बिग बॉस’च्या घरात होणार या चर्चेतल्या सेलिब्रिटींची एण्ट्री?
2 ‘इश्कबाज’फेम अभिनेत्री श्रेनू पारिखला करोनाची लागण
3 …जेव्हा अंकिताने सुशांतला केलं होतं प्रपोज; थ्रोबॅक व्हिडीओ होताय व्हायरल…
Just Now!
X