News Flash

‘भारत’मधील सर्वात जीवघेणा स्टंट साकारणार युपीमधील रायडर्स

चित्रपटामधील एका सीनसाठी 'मौत का कुआँ'चा थरारक स्टंट करण्यात आला आहे.

बॉलिवूडचा भाईजान अर्थात अभिनेता सलमान खान त्याच्या आगामी ‘भारत’ या चित्रपटामध्ये व्यस्त आहे. या चित्रपटामध्ये सलमानसोबत कतरिना स्क्रिन शेअर करणार असून यात मोठ्या प्रमाणावर साहसदृश्यांचा समावेश करण्यात आला आहे. या चित्रपटातील एका थरारक साहसदृश्याचं चित्रीकरण नुकतंच पार पडलं आहे.

चित्रपटामधील एका सीनसाठी ‘मौत का कुआँ’चा थरारक स्टंट करण्यात आला असून हा स्टंट उत्तर प्रदेशातल्या काही रायडर्सनी केला आहे. याच सीनचं चित्रीकरण सुरु असतानाचे काही फोटो दिग्दर्शक अब्बास अली जफर यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यावेळी ‘माझ्या आयुष्यातला सर्वात खतरनाक स्टंट’, असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, या चित्रपटामध्ये आणखी काही साहसदृश्यांचा समावेश करण्यात आला असून या चित्रपटातील सलमानचे लूकही समोर आले आहेत. यात सलमान पाच वेगवेगळ्या लूकमध्ये दिसणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 5, 2018 10:35 am

Web Title: salman khan bahart will have maut ka kuwan
Next Stories
1 पंचविशीपर्यंत मनात आत्महत्येचे विचार यायचे-ए. आर. रहमान
2 ‘व्हॅनिला, स्ट्रॅाबेरी अँण्ड चॉकलेट’च्या कलाकारांची अनोखी भाऊबीज
3 ‘बिग बॉस’मुळे माझं आर्थिक नुकसान- अनुप जलोटा
Just Now!
X