News Flash

टायगर आज तुरुंगातच, जामीन अर्जावर उद्या निकाल

सलमानला कालची रात्री जोधपूरच्या मध्यवर्ती कारागृहात काढावी लागली. कैदी नंबर १०६ असलेल्या तुरुंगात कोणतीही विशेष वागणूक मिळणार नसल्याचे कालच तुरुंग अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले होते. न्यायालयाने

काळवीट शिकार प्रकरणात पाच वर्ष तुरुंगवासाची शिक्षा झालेला बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या जामीन अर्जावर आज सकाळी साडेदहा वाजता जोधपूर सत्र न्यायालयात सुनावणी झाली. मात्र, आज निर्णय न घेता उद्या सुनावणी होणार आहे. अर्धा तास वकिलाची बाजू ऐकल्यावर उद्या सकाळी न्यायालय 10.30 वाजता निकाल देण्यात येणार आहे. त्यामुळे सलमानचा आजचा मुक्कामही तुरूंगातच होणार आहे.

सलमान खानच्या वकिलांनी युक्तिवाद केला की, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार विश्वासार्ह नव्हते. तसेच परिस्थितीजन्य पुरावाही तितकासा भक्कम नाही त्यामुळे त्याला जामिन देण्यात यावा. या मागणीस सरकारी वकिलांनी जोरदार विरोध केला आणि सांगितले की सलमानचा इतिहास गुन्हेगारीचा आहे. एका प्रकरणात तो दोषी आढळला असून त्याला हायकोर्टाने निर्दोष ठरवले, मात्र, त्याविरोधातील अपील सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. तसेच त्याला झालेली शिक्षा मोठी असून त्याला जामिन देऊ नये. न्यायाधीशांनी या जवळपास अर्धा तास चाललेल्या सुनावणीनंतर निकाल राखून ठेवला आहे. सलमानला जामीन मिळणार की तो तुरूंगात राहणार हे आता उद्याच स्पष्ट होणार आहे. मात्र, आज आणखी एक रात्र मात्र त्याला तुरुंगात काढावी लागणार हे निश्चित झाले आहे.

सलमानला आज तुरुंग कैद्याचा गणवेश देण्यात येणार आहे. न्यायालयाने काल सलमानला दोषी ठरवतानाच या प्रकरणात अन्य आरोपींना दोषमुक्त केले. यामुळे सोनाली बेंद्रे, नीलम आणि अभिनेता सैफ अली खान यांना दिलासा मिळाला. काळवीट शिकार प्रकरणात जोधपूरमधील न्यायालयाने गुरुवारी निकाल दिला. न्या. देवकुमार खत्री यांनी या प्रकरणी निकाल दिला.

मुख्य महानगर न्यायदंडाधिकारी देव कुमार खत्री यांनी निकाल देताना महत्वाची निरीक्षण नोंदवली. आरोपी हा लोकप्रिय कलाकार असून लोक त्यांच्या कृतीचे अनुकरण करतात असे खत्री यांनी आपल्या निकालात म्हटले आहे. बचाव पक्षाने सलमानला याआधी कुठल्याही प्रकरणात शिक्षा झालेली नाही. तो नेहमीच दिलेल्या तारखेला उपस्थित राहिला आहे असे न्यायालयाला सांगितले. सलमान पाच दिवस वनविभागाच्या ताब्यातही होता.

त्यामुळे त्याला प्रोबेशन ऑफ ऑफेंडर्स अॅक्टखाली संधी मिळाली पाहिजे असे सलमानच्या वकिलांनी सांगितले. पण न्यायाधीशांनी परिस्थिती आणि गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेऊन सलमानला संधी देण्यास नकार दिला. वन्य प्राण्यांची बेकायद शिकारण करण्याच्या घटना वाढत आहेत. त्यामुळे गुन्हयाची गंभीरता लक्षात घेऊन प्रोबेशन ऑफ ऑफेंडर्स अॅक्टचा आरोपीला लाभ देता येणार नाही असे न्यायाधीशांनी स्पष्ट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 6, 2018 8:31 am

Web Title: salman khan bail hearing today
टॅग : Bail,Salman Khan
Next Stories
1 २०११ विश्वचषक विजेत्या भारतीय संघातील खेळाडू फिक्सिंगच्या जाळ्यात? राजस्थान पोलीसांकडून तपास सुरु
2 योगी आदित्यनाथांच्या विरोधात भाजपा खासदाराची मोदींकडे तक्रार
3 ‘हाफिज सईदला त्रास देऊ नका, त्याला सामाजिक कार्य करू द्या’
Just Now!
X