‘बिग बॉस’ हा छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शो पैकी एक म्हणून ओळखला जातो. मात्र या लोकप्रियतेमागे ‘बिग बॉस’चा होस्ट सलमान खानचा सिंहाचा वाटा आहे. सलमानच्या अफाट फॅन फॉलोइंगमुळेच बिग बॉसने अल्पावधीत प्रचंड लोकप्रियता मिळवली. आता या शोचा १४ वा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. मात्र या शोचं होस्टिंग सलमान सेटवरुन नव्हे तर थेट आपल्या घरातूनच करणार आहे. करोनाच्या भीतीमुळे सलमानने वर्क फ्रॉम होम करण्याचा निर्णय घेतला आहे.

अवश्य पाहा – ‘जय महाराष्ट्र’ म्हणत अमेरिकेतील डॉक्टर करतोय रुग्णांची सेवा; अवधूत गुप्तेने केलं कौतुक

पिंकविलाने दिलेल्या वृत्तानुसार सलमानने सेटवर जाऊन शूटिंग करण्यास नकार दिला आहे. तो शोच्या ग्रँड वेलकम स्टेज शोमध्ये देखील येणार नाही. तो आपल्या पनवेलच्या फार्म हाऊसवरुन मोजक्या लोकांसोबतच ‘बिग बॉस’ होस्टिंग करणार आहे. करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सलमानला कुठलाही धोका पत्करायचा नाही. त्यामुळे त्याने थेट वर्क फ्रॉम होमचा पर्याय स्विकारला आहे. सलमान घरातूनच होस्टिंग करत असला तरी देखील ‘बिग बॉस’च्या घरातील मजा जराही कमी होणार नाही अशी ग्वाही निर्मात्यांनी प्रेक्षकांना दिली आहे.

अवश्य पाहा – विद्युत जामवालने वाढवला देशाचा मान; व्लादिमीर पुतिन यांच्यासोबत ‘या’ यादीत मिळवलं स्थान

करोनाबाधित रुग्णसंख्येने ओलांडला ११ लाखांचा टप्पा

भारतात गेल्या २४ तासात ३७ हजार ७२४ नवे करोनाबाधित रुग्ण आढळले असून करोनाबाधित रुग्णसंख्या १२ लाखांच्या जवळ पोहोचली आहे. भारतात सध्या करोनाचे ११ लाख ९२ हजार रुग्ण आहेत. यामध्ये ६ लाख ५३ हजार ५० जणांना उपचार करुन घरी सोडण्यात आलेलं असून ४ लाख ११ हजार १३३ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. सोबतच गेल्या २४ तासात ६४८ मृत्यूंची नोंद झाली असून मृतांची संख्या २८ हजार ७३२ इतकी झाली आहे.