News Flash

अशी झाली होती सलमान बरोबर पहिली भेट, शेराने केला खुलासा

शेराने एका मुलाखतीमध्ये खुलासा केला आहे.

बॉडीगार्ड हे सेलिब्रिटींच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा भाग असतात. अनेक कलाकारांचे त्यांच्यामध्ये मैत्रिचे चांगले नाते असल्याचे पाहायला मिळते. बॉलिवूडचा भाईजान सलमान खान आणि त्याचा बॉडीगार्ड शेरा यांच्यामध्ये असेच काहीसे नाते आहे. सलमान शेराला त्याच्या कुटुंबातील एक सदस्यच मानतो. पण शेरा आणि सलमानची भेट कशी झाली? असा प्रश्न अनेकांना पडतो. आता शेरानेच एका मुलाखतीमध्ये पहिल्यांदा सलमानला कुठे भेटला हे सांगितले आहे.

गेल्या २६ वर्षांपासून शेरा सलमानसाठी काम करत आहे. एकेकाळी सलमान शेराच्या मुलाला बॉलिवूडमध्ये लाँच करणार असल्याच्या देखील चर्चा रंगल्या होत्या. नुकताच शेराने एका यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने सलमानसोबतच्या पहिल्या भेटीचा खुलासा केला आहे.

आणखी वाचा: अमिताभ बच्चन ते अक्षय कुमार, यांच्या बॉडीगार्ड्सची सॅलरी माहितेय का?

 

View this post on Instagram

 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

‘जेव्हा मी गायिका व्हिटफिल्डच्या भारतातील कार्यक्रमासाठी काम करत होतो तेव्हा आमची पहिली भेट झाली. ती हॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय गायिका आहे. त्यानंतर पुन्हा आमची भेट हॉलिवूड अभिनेता Keanu Reeves जेव्हा भारतात आला होता तेव्हा झाली. स्पीड प्रदर्शित झाला होता आणि मॅट्रिक्स प्रदर्शित होणार होता. मी सलमानसोबत चंदिगढमधील कार्यक्रमात पहिल्यांदा एकत्र काम केले होते. तेव्हा पासून मी त्याच्यासोबत काम करत आहे’ असे शेरा म्हणाला.

पुढे शेरा सलमानच्या बॉडीकार्ड चित्रपटाविषयी बोलताना म्हणाला, ‘आता पर्यंत इंडस्ट्रीमध्ये कोणीही आपल्या बॉडीगार्डसाठी असे केलेले नाही. मला फक्त माझ्या मालकाबद्दल काळजी वाटते. तो जिथे जिथे जाईल तिथे मी असेल. आता पर्यंत मालकानी मला जे काही करायला सांगितले ते मी केले. म्हणूनच मी मालकाच्या कुटुंबाचा एक भाग आहे.’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 11, 2021 11:59 am

Web Title: salman khan bodyguard shera talking about how he met the megastar for the first time avb 95
Next Stories
1 “समाजाच्या भल्यासाठी वेळ द्या”, ट्रोल करणाऱ्यांवर फरहान भडकला
2 सोनू सूद आणि सलमान खान यांना पंतप्रधान बनवले पाहिजे – राखी सावंत
3 ‘जमाई राजा’ फेम रवी दुबे करोना पॉझिटिव्ह
Just Now!
X