बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलमान खानचा धाकटा भाऊ अरबाज खान पुन्हा एकदा लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा आहे. गेल्या काही महिन्यांपासून अरबाज इटालियन मॉडेल जॉर्जिया अँड्रियानीला डेट करत आहे. तिच्याशी अरबाज लग्नगाठ बांधणार असल्याचं म्हटलं जात आहे.

अरबाजला जॉर्जियासोबत लग्न करण्याची इच्छा आहे, मात्र खान कुटुंबियांची तिला पसंती नसल्याचं कळतंय. मॉडेल- अभिनेत्री मलायका अरोरासोबत १८ वर्षांच्या संसारानंतर अरबाज खान २०१७ मध्ये विभक्त झाला. अरबाज आणि मलायका यांना एक मुलगाही आहे. घटस्फोटानंतरही मलायका आणि अरबाज यांच्यातील मैत्री कायम आहे. खान कुटुंबातील सोहळ्यांना ती अनेकदा उपस्थिती लावते.

wife does not wear saree of my choice husband created ruckus matter reached police station couple goes for divorce
पत्नी आवडीची साडी नेसत नाही; कंटाळलेल्या पतीने लग्नानंतर ८ महिन्यातच मागितला घटस्फोट
sandeshkhali shahajahan shiekh
Sandeshkhali Case: लैंगिक अत्याचार प्रकरणातील फरार आरोपी आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्याला अटक नेमकी कशी झाली?
russian soldier
‘रशियात अडकलेल्या २० भारतीयांच्या सुटकेसाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न’, परराष्ट्र खात्याची माहिती
house burglars
घरफोडी करणाऱ्या टोळीचे जाळे उद्ध्वस्त, हसन कुट्टीसह १० गुन्हेगार ताब्यात

गेल्या वर्षी अरबाज रोमानियन वंशाच्या अॅलेक्झांड्रा कॅमेलियाला डेट करत असल्याचं समोर आलं होतं. अरबाज आपल्या इन्स्टाग्रामवर तिच्यासोबतचे फोटो शेअर करत असे. अरबाज खानने आयपीएलमधील सामन्यांवर सट्टेबाजी केल्याची कबुली काही महिन्यांपूर्वी दिली होती. त्याच्या याच सवयींमुळे अरबाज- मलायकामध्ये वितुष्ट आल्याचं म्हटलं जातं.

Kasautii Zindagii Kay 2: कोमोलिकाच्या भूमिकेत हिना खानऐवजी क्रिस्टल डिसूझा झळकणार?

काही दिवसांपूर्वी अभिनेता संजय कपूरच्या घरी झालेल्या पार्टीला अरबाज- जॉर्जिया एकत्र आले होते. त्यामुळे आता कुटुंबीयांच्या विरोधात जाऊन अरबाज जॉर्जियाशी लग्नगाठ बांधणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.