दबंग सलमान खानच्या आशिर्वादाने बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्रीनीच नव्हे तर अभिनेत्यांच्या कारकिर्दीला फुलवली आहे. सलमान हिच कृपादृष्टी आता प्रेयसी लुलिया वेंतुरवर करणार असल्याचे संकेत आहेत. रोमानियाच्या लुलियाला बॉलिवूड क्षेत्रात आपले नाव कमावयची इच्छा आहे. तिचे बॉलिवूडमधील स्वप्न साकार करण्यासाठी सलमाने सुरुवात केली आहे. खान चित्रपट निर्मित ‘ओ तेरी’ या चित्रपटामध्ये लुलियाने एका गाण्यावर थिरकली होती. त्यानंतर नुकताच प्रदर्शित झालेल्या सलमानच्या सुलतान चित्रपटात ‘बेबी को बेस पसंद है’.. या गाण्याला देखील लुलियाने आवाज दिला होता.
लुलिया बॉलिवूडमध्ये अवतरण्याचे स्वप्न पाहत असली तरी तिला आतापर्यंत म्हणावे तसे यश मिळालेले नाही. लुलियाला बॉलिवूडमध्ये विशेष ओळख निर्माण करुन देण्याचे सलमानने मनावर घेतल्याचे दिसते. सलमानने यासाठी मोहम्मद रफी यांनी गायलेल्या एका गाण्याचे अधिकार विकत घेतले. त्यामुळे मोहम्मद रफींच्या आवाजातील  ‘सज रही मेरी मां सुनहरे गोटे में ‘ हे गाणे आता लुलिया वेंतुरच्या आवाजात एेकायला मिळू शकते. हे गाणे लुलियाच्या आवाजात पुन्हा रेकॉर्ड करता यावे. यासाठी सलमाने गाण्याचे अधिकार विकत घेतल्याची चर्चा बॉलिवूड वर्तुळात रंगली आहे.
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान आणि त्याची कथित प्रेयसी लुलिया वेतुंर यांच्या प्रेमप्रकरणाचे वर्षा अखेरीस विवाहबद्ध होणार असल्याचाही अंदाज व्यक्त करण्यात येत आहेत. पण अद्याप दोघांनी आपल्या नात्याबद्दल एक शब्दही उच्चारलेला नाही.  बॉलिवूड इंडस्ट्रीत नशीब उघडण्यासाठी किंवा ब्रेक मिळविण्यासाठी आजपर्यंत अनेक अभिनेत्रींनी सलमान खानचा आधार घेतला आहे. मात्र, लुलियाची आत्तापर्यंतची वाटचाल पाहता बॉलिवूडमध्ये करिअर करणे, ही तिची महत्त्वकांक्षा असेल असे वाटले नव्हते.