बॉलिवूडमधील लोकप्रिय कलाकार म्हणून ओळखला जाणारा सलमान खान ३० वर्षांपूर्वी ‘मैंने प्यार किया’ या चित्रपटामुळे प्रसिद्धी झोतात आला. या चित्रपटात भाग्यश्री, आलोकनाथ, रीमा लागू, राजीव वर्मा, रेणुका शहाणे आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याही मुख्य भूमिका होत्या. त्याकाळी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान चालला. इतकंच नाही तर आजही या चित्रपटाची लोकप्रियता तसूभरही कमी झालेली नाही. विशेष म्हणजे सुपरहिट ठरलेला हा चित्रपट सलमानने नाइलाजाने स्वीकारला होता. मात्र याच चित्रपटाने सलमानला आज एक वेगळी ओळख निर्माण करुन दिली.

सुपरहिट ठरलेल्या या चित्रपटामध्ये सलमान मुख्य भूमिकेत झळकला होता. मात्र त्याने हा चित्रपट नाइलाजाने स्वीकारला होता. मात्र याच चित्रपटामुळे सलमान आज लोकप्रिय अभिनेता झाला आहे. या चित्रपटातून त्याने पहिल्यांदा मुख्य अभिनेता म्हणून काम केलं. यापूर्वी त्याने ‘बीवी हो तो ऐसी’ या चित्रपटात काम केलं होतं. मात्र या चित्रपटात त्याने सहाय्यक अभिनेत्याची भूमिका साकारली होती.

वाचा :  सलमान म्हणतो, ‘मैंने प्यार किया’च्या यशाचं क्रेडिट लक्ष्मीकांत बेर्डेंना

बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेल्या सलमानने सुरुवातीच्या काही चित्रपटांमध्ये सहायक अभिनेता म्हणून काम केलं होतं. मात्र ‘मैंने प्यार किया’ या चित्रपटातून पहिल्यांदाच त्याला मुख्य अभिनेत्याची भूमिका साकारण्याची संधी मिळाली. विशेष म्हणजे या चित्रपटामध्ये अन्य एक अभिनेता प्रेम ही व्यक्तीरेखा साकारणार होता. परंतु त्याने ऐनवेळी नकार दिल्यामुळे सलमानला या चित्रपटासाठी विचारणा करण्यात आली. त्यावेळी सलमानच्या करिअरमध्ये अनेक चढउतार येत होते. त्यामुळे हा चित्रपटही स्वीकारण्यासाठी  तो फारसा उत्सुक नव्हता. तरीदेखील त्याने नाइलाजास्तोवर चित्रपटात काम करण्यास होकार दिला. मात्र हाच चित्रपट त्याच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरला. हा चित्रपट त्याकाळी सुपरहिट ठरला. दरम्यान, ‘मैंने प्यार किया’नंतर त्याचे ‘बागी’, ‘सनम बेवफा’, ‘कुर्बान’, पत्थर के फुल’ आणि ‘साजन’ हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजले.