01 March 2021

News Flash

Video: सलमानने साजरा केला बॉडीगार्डचा वाढदिवस, पण…

हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

(Photo Credit- Voompla video)

सध्या बॉलिवूडचा भाईजान सलामान खान त्याचा आगामी चित्रपट ‘अंतिम’च्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. काही दिवसांपूर्वी चित्रपटाच्या सेटवरील सलमानचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओद्वारे सलमानचा ‘अंतिम’ चित्रपटातील लूक समोर आला होता. आता सलमानचा सेटवरील आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये सलमान बॉडीगार्डचा वाढदिवस साजरा करताना दिसत आहे.

नुकताच ‘अंतिम’ चित्रपटाच्या सेटवर सलमानने त्याचा बॉडीगार्ड जग्गीचा वाढदिवस साजरा केला. जेव्हा जग्गी सलमानला केक भरवायला जातो तेव्हा सलमान मजेशीर अंदाजात तोंड दुसरीकडे फिरवताना दिसतो. तो केक खात नाही. ते पाहून सेटवर उपस्थित असलेले लोकांना हसू येते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Voompla (@voompla)

सलमान खानचा बॉडीगार्डचा वाढदिवस साजरा करतानाचा व्हिडीओ वुंम्पलाने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून अनेकजण त्यावर लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

सलमान खानच्या ‘अंतिम’ या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर करत आहेत. या चित्रपटात अभिनेत आयुष शर्मा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सलमान या चित्रपटात एका पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 12, 2020 2:50 pm

Web Title: salman khan celebrates bodyguard birthday but not ate cake avb 95
Next Stories
1 येत्या दोन वर्षात रणवीर सिंग घेऊन येणार ७ नवे चित्रपट?
2 लग्नाची मागणी घालणाऱ्या चाहतीला टायगर श्रॉफचं विचारपूर्वक उत्तर
3 वादग्रस्त वक्तव्यामुळे युवराज सिंगच्या वडिलांची ‘या’ चित्रपटातून हकालपट्टी
Just Now!
X