News Flash

महेश मांजरेकरांच्या लेकीचा जिममधील डान्स व्हिडीओ व्हायरल

हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे.

‘दबंग ३’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री म्हणजे सई मांजरेकर. ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचे दिसते. फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत सई चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. ‘दबंग ३’ चित्रपटातून प्रकाश झोतात आलेली सलमानची को-स्टार अभिनेत्री सई मांजरेकरचा सध्या एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. तिचा हा व्हिडीओ जिममधला आहे.

सईने हा व्हिडिओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत ६१ हजाराहून अधिक लोकांनी लाइक केलं आहे. हा व्हिडिओ शेअर करताना सई म्हणाली की, “माझ्या भावाची आणि एक ट्रेनर असल्याची झलक. तो नेहमीच मला साथ देतो. सेटवर मी काय करते हे पाहण्यासाठी तो कायम पुढे असतो.” पहिल्या व्हिडिओमध्ये सई व्यायाम करत असून दुसऱ्या व्हिडिओमध्ये ती एका इंग्रजी गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saiee M Manjrekar (@saieemmanjrekar)

दरम्यान, सई मांजरेकर ही बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांची मुलगी आहे. सलमान खानसोबत ‘दबंग ३’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर सई ‘मांझा’ या अल्बम सॉंगमध्ये दिसली होती. या गाण्यात ती सलमानचा मेहुणा आयुष शर्मासोबत दिसली होती. सलमानच्या ‘अंतिम’ या आगामी चित्रपटात अविका गौरच्या जागी सई असेल अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. ‘कोईमोई’ने दिलेल्या रिपोर्टनुसार याची माहिती सईचे वडील महेश मांजरेकर यांनी दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 17, 2020 1:18 pm

Web Title: salman khan co star mahesh majrekar daughter actress sai manjrek video viral dcp 98 avb 95
Next Stories
1 ‘लक्ष्यामामांचा फोन आला आणि..’, भरत जाधवची भावनिक पोस्ट
2 बिग बींना आवडला नाही केबीसीमध्ये विचारण्यात आलेला ‘हा’ प्रश्न
3 ‘आश्रम’ या वेब सीरिजला मिळाले तब्बल इतके कोटी व्ह्यूज
Just Now!
X