News Flash

सरोज खान यांना इंडस्ट्रीत काम मिळेना; अखेर सलमान धावून आला मदतीला

यासंदर्भात खुद्द सरोज खान यांनी एका मुलाखतीत खुलासा केला आहे.

सलमान खान, सरोज खान

बॉलिवूडचा भाईजान अर्थात अभिनेता सलमान खान इंडस्ट्रीत अनेक कलाकारांच्या मदतीला धावून जातो. याची बरीच उदाहरणं आजपर्यंत ऐकायला मिळाली. नव्वदच्या दशकात माधुरी दीक्षित, श्रीदेवी, सुश्मिता सेन आणि यांसारख्या इतर अभिनेत्रींना आपल्या तालावर नाचवणाऱ्या कोरिओग्राफर सरोज खान यांचीही सलमान खानने मोलाची मदत केली आहे. एकेकाळी सरोज खान या बॉलिवूडच्या सर्वाधिक लोकप्रिय कोरिओग्राफर होत्या. पण गेल्या काही वर्षांपासून त्यांना इंडस्ट्रीत काम मिळत नव्हतं. यासंदर्भात खुद्द सरोज खान यांनी एका मुलाखतीत खुलासा केला आहे.

‘अलीकडे जेव्हा मी सलमानला भेटले तेव्हा त्याने माझ्या कामाबद्दल विचारपूस केली. सध्या इंडस्ट्रीत काहीच काम मिळत नसून नवोदित अभिनेत्रींना मी क्लासिकल डान्स शिकवत असल्याचं सांगितलं. हे ऐकताच आता तुम्ही माझ्यासोबत काम करणार आहात, असं तो म्हणाला. सलमान खान दिलेला शब्द पाळतो हे मला ठाऊक होतं,’ असं त्या म्हणाल्या.

सलमानच्या आगामी ‘दबंग ३’ या चित्रपटासाठी सरोज खान कोरिओग्राफी करणार असल्याचं म्हटलं जात आहे. सलमान आणि सरोज खान यांनी ‘बीवी हो तो ऐसी’, ‘बीवी नंबर १’, ‘अंदाज अपना अपना’ यांसारख्या अनेक चित्रपटांसाठी एकत्र काम केलं आहे. मध्यंतरी या दोघांमध्ये काही वादसुद्धा झाले होते. पण गेल्या वर्षी गणेशोत्सवादरम्यान सलमानने हा वाद मिटवला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 31, 2019 11:38 am

Web Title: salman khan comes to choreographer saroj khan rescue after she runs out of work in the industry
Next Stories
1 Game of Thrones फेम पीटर डिंकलेजचा भाऊ पाकिस्तानात पुसतो टेबल
2 Superman : एक शापित सुपरहिरो
3 राजकीय डायलॉगबाजी..
Just Now!
X