23 January 2020

News Flash

Video : आईसोबत या गाण्यावर थिरकला सलमान खान

या व्हिडीओला लाखो लाइक्स मिळाले असून अनेकांनी त्यावर कमेंट्स केल्या आहेत.

सलमान खान व त्याची आई सलमा खान

सलमान खान सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रीय असतो. ट्विटर, इन्स्टाग्राम अकाऊंटवर तो फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतो. नुकताच त्याने इन्स्टाग्रामवर आईसोबत नाचतानाचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे आणि सध्या सोशल मीडियावर तो चांगलाच व्हायरल होत आहे.

‘चिप थ्रील्स’ या प्रसिद्ध गाण्यावर सलमान खान व त्याची आई सलमा डान्स करताना या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. मुलासोबतचा डान्स करतानाचे क्षण सलमासुद्धा एन्जॉय करताना दिसत आहेत. डान्सनंतर सलमान आईला मिठी मारतो आणि जेव्हा त्याच्या आईला कळतं हे सगळं व्हिडीओ शूट होत आहे, तेव्हा त्या लगेच शूट करणाऱ्या व्यक्तीला म्हणतात, ‘बंद कर हा कॅमेरा’.

View this post on Instagram

Mom is saying band karo yeh naach ganna..

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on

‘आई म्हणतेय, बंद करा हे नाचगाणं,’ असं कॅप्शन सलमानने या व्हिडीओला दिलं आहे. या व्हिडीओला लाखो लाइक्स मिळाले असून अनेकांनी त्यावर कमेंट्स केल्या आहेत. अभिनेता वरूण धवनलाही सलमानचा त्याच्या आईसोबतचा डान्स आवडला असून त्यानेही कमेंट्समध्ये इमोजी पोस्ट केले आहेत.

आपल्या व्यग्र वेळापत्रकातून सलमान कुटुंबीयांसाठी आवर्जून वेळ काढतो. कधी भाच्यासोबत तर कधी आई-वडिलांसोबत सलमान वेळ घालवण्यास विसरत नाही. सध्या तो ‘दबंग ३’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. त्याचसोबत तो ‘नच बलिये ९’ या डान्स रिअॅलिटी शोची निर्मिती करत आहे.

First Published on July 23, 2019 10:52 am

Web Title: salman khan dance with mother salma to sia cheap thrills watch video ssv 92
Next Stories
1 ‘चांद्रयान २’च्या यशस्वीरित्या प्रक्षेपणानंतर प्रभास म्हणतो…
2 Photo: …अन् बुडता बुडता वाचली प्रियांका
3 उमेशसोबत बऱ्याच वर्षांनंतर काम करण्याविषयी प्रिया म्हणते…
Just Now!
X