News Flash

Video : ‘जीने के है चार दिन’, सलमान खानचा भन्नाट डान्स, व्हिडीओ व्हायरल

नुकतंच सलमानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी त्यावर भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Video : ‘जीने के है चार दिन’, सलमान खानचा भन्नाट डान्स, व्हिडीओ व्हायरल

बॉलिवूडचा भाईजान सलमान खान हा नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. सलमान खानचा चाहतावर्ग प्रचंड मोठा असून तो नेहमी त्यांच्या संपर्कात राहतो. सलमान सध्या आगामी चित्रपट ‘टायगर ३’ च्या चित्रीकरणात व्यस्त आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण तुर्कस्तानमध्ये होत आहे. मात्र नुकतंच सलमानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी त्यावर भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत.

सलमानच्या व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओत तो एका गाण्यावर नाचताना दिसत आहे. हे गाणे त्याच्या एका सुपरहिट चित्रपटातील आहे. या व्हिडीओत सलमान हा ‘मुझसे शादी करोगी’ या चित्रपटातील ‘जीने के है चार दिन’ या गाण्यावर डान्स करताना पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे त्याच्या आजूबाजूला असणाऱ्या इतरांनीही या गाण्यावर ठेका धरल्याचे पाहायला मिळत आहे. तर यातील काही जण हे सलमानचा डान्स बघत उभे आहेत. तर काही जण त्याच्या डान्सचा व्हिडीओ काढताना दिसत आहे. एका सोशल मीडिया युजरने त्याचा हा व्हिडीओ शेअर केला आहे.

या चित्रपटातील चित्रीकरणादरम्यान सलमान खान हा सूर्यास्ताचा आनंद घेतानाही पाहायला मिळत होता. याचा एक फोटो नुकतंच त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोत सलमान हुडी घालून गॅलरीत उभा राहून सूर्योदयाच्या सुंदर दृश्याचा आनंद घेताना दिसत आहे. सलमानचा हा फोटो तुर्कस्तानातील आहे. त्याच्या या फोटोवर हजारो लाईक्स आणि कमेंट्स पाहायला मिळत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

सलमान खान लवकरच ‘टायगर ३’ हा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात सलमानसोबत अभिनेत्री कतरिना कैफ मुख्य भूमिकेत दिसणार आहे.‘टायगर ३’यात सलमान पुन्हा एकदा रॉ एजंटची भूमिका साकारताना दिसेल. तर कतरिना यात आयएसआय एजंट झोयाची भूमिका साकारणार आहे. यात आभिनेता इमरान हाशमी खलनायकेच्या भूमिकेत दिसेल. याआधी सलमान आणि कतरिनाने अली अब्बास जाफरच्या ‘भारत’या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. त्यामुळे त्यांचे चाहते त्यांना पुन्हा एकत्र पाहण्यासाठी प्रचंड उत्सुक आहेत.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 13, 2021 4:53 pm

Web Title: salman khan dances to his song jeene ke hain chaar din in turkey video viral nrp 97
Next Stories
1 “त्यांच्या गुंडांनी मला पाठीमागून लाथ मारली”, महिला सरपंचाचे गंभीर आरोप! रुपाली चाकणकरांनी ट्वीट केला व्हिडीओ
2 ‘तारक मेहता…’मध्ये ती पुन्हा आली; चाहत्यांसाठी आनंदाची बातमी
3 ब्राह्मणांवर बहिष्कार टाकण्याचं आवाहन; पोलिसांकडून थेट मुख्यमंत्र्यांच्या वडिलांवरच गुन्हा दाखल
Just Now!
X