News Flash

सलमान म्हणतो तो मी नव्हेच! दुबईत पत्नी व १७ वर्षांची मुलगी? काहीही…

एका मुलाखतीत सलमानला पत्नी आणि मुलीबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता.

एका मुलाखतीत सलमानला पत्नी आणि मुलीबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता.

बॉलिवूडचा भाईजान सलमान खान हा कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सतत चर्चेत असतो. आता सलमानने त्याचा भाई अरबाज खानच्या ‘पिंच’च्या शोमध्ये हजेरी लावली होती. ‘पिंच’चा हा २ रा सीजन आहे. यात पहिला पाहुणा हा सलमानच होता. या शोच्या फॉरमॅट प्रमाणे येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याला नेटकऱ्यांनी केलेल्या ट्वीटवर प्रतिक्रिया द्यायची असते. यावेळी सलमानचं एक कुटुंब आहे, म्हणजेच त्याची एक पत्नी आणि १७ वर्षाची एक मुलगी आहे आणि ते दुबईत राहताा यावर प्रश्न विचारण्यात आला होता.

अरबाजने एक कमेंट वाचली त्यात लिहीले होते की ‘कुठे लपून बसला आहेस? भारतातील प्रत्येकाला हे माहित आहे की तू पत्नी नूर आणि १७ वर्षाची मुलगी यांच्यासोबत दुबईत आहेस. भारताच्या लोकांना कधी पर्यंत मुर्ख बनवशील’ हे ऐकल्यानंतर सलमानला आधी आश्चर्य वाटते. मग तो म्हणाला, ‘हे कोणासाठी आहे?’

 

View this post on Instagram

 

A post shared by Arbaaz Khan (@arbaazkhanofficial)


आणखी वाचा : ‘पत्नी योगचे तर पती बनवतो पॉर्न व्हिडीओ’, ‘हंगामा २’ मधील गाणं प्रदर्शित होताच शिल्पा शेट्टी झाली ट्रोल 

जेव्हा अरबाजने त्याला सांगितले की ही कमेंट तुझ्यासाठी आहे. तेव्हा सलमान म्हणाला, ‘या लोकांना बरचं काही माहित आहे. हे सगळं खोटं आहे. हे कोणा बद्दल बोलत आहेत या बद्दल मला काही कल्पना नाही. मुळात हा कोण आहे?, जो मला विचारतो आणि मी त्याला उत्तर देणार…, दादा माझी कोणी पत्नी नाही आहे. मी भारतात राहतो, गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये मी ९ वर्षांचा होतो तेव्हा पासून राहतो. मी या माणसाला उत्तर देणार नाही. मी कुठे राहतो हे संपूर्ण भारताला माहित आहे.’

आणखी वाचा : ..म्हणून शिल्पाने विकला बुर्ज खलिफामधील ५० कोटी रुपयांचा फ्लॅट

या शोमध्ये सलमान सोबत फरहान अख्तर, अनिल कपूर, अनन्या पांडे, आयुषमान खुराना, कियारा आडवाणी, राजकुमार राव अशा अनेक कलाकारांनी हजेरी लावली आहे. हा सीजन बोल्ड असणार असल्याचं अरबाजने सांगितलं आहे. या शोचा हा प्रोमो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 21, 2021 6:53 pm

Web Title: salman khan denies having wife named noor and 17 year old daughter in dubai dcp 98
Next Stories
1 आदित्य नारायण लवकरच बनणार पिता?; हिंट देत शेअर केली ही गोड बातमी
2 कॅप्टन दिलीप दोंदे आणि अभिनेता जितेंद्र जोशी खेळणार ‘कोण होणार करोडपती’
3 ब्रा स्ट्रॅप दाखवल्याने ‘तारक मेहता…’मधील अभिनेत्री ट्रोल, पतीने नेटकऱ्याला दिलं सडेतोड उत्तर
Just Now!
X