बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खानचा बहुप्रतिक्षीत ‘राधे: युअर मोस्ट वॉन्टेड भाई’ या फिल्मच्या ट्रेलर नंतर आज फिल्मचं पहिलं गाणं रिलीज करण्यात आलंय. ‘सिटी मार’ हे गाणं रिलीज होण्याआधीपासूनच त्यावर कॉपीचा शिक्का लागला होता. सलमान खानचं हे गाणं साऊथ सुपरस्टार अल्लु अर्जुनच्या ‘DJ’ फिल्मधल्या ‘सिटी मार’ची कॉपी असल्याने या गाण्याची चर्चा रंगली होती. विशेष म्हणजे गाणं रिलीज झाल्यानंतर या गाण्यासाठी सलमान खाननं साऊथ सुपरस्टारला अल्लु अर्जुनला ‘Thank You’ म्हटल्यानं सगळ्यांच्यच भुवया उंचावल्या आहेत.

सलमान खानचे ‘सिटी मार’ हे गाणे 2017 मध्ये प्रदर्शित झालेल्या अल्लू अर्जुनच्या एका तेलुगु चित्रपटातील हिट गाण्याचे रीक्रिएटेड व्हर्जन आहे. या व्हर्जनमध्ये सलमान खान झळकत असल्यानं त्याने साऊथ सुपरस्टार अल्लु अर्जुनला धन्यवाद म्हटलंय. खरं तर ज्यावेळी या चित्रपटाचा ट्रेलर आला त्यावेळीच या फिल्मवर कॉपीचा शिक्का लागला होता. ‘सिटी मार’ गाण्यात सलमान खान त्याच स्टेप करताना दिसून येतोय, ज्या साऊथ सुपरस्टार अल्लु अर्जुन त्याच्या ‘Duvvada Jagannadham’ मधल्या एका गाण्यात करताना दिसून येतोय. त्यामुळे आधीच हीट झालेल्या साऊथच्या गाण्यांची कॉपी करून बॉलिवूडमध्ये आपली फिल्म हीट करण्याचा मंत्र सलमान खानने वापरला आहे.

‘सिटी मार’ या गाण्यासाठी सलमान खानने ट्विट करत अल्लु अर्जुनला धन्यवाद म्हटलंय. ” ‘सिटी मार’ या गाण्यासाठी धन्यवाद अल्लु अर्जुन…ज्या स्टाईलने तुम्ही या गाण्यात परफॉर्म केलंय, डान्स केलाय, एकंदरीत सगळंच धमाकेदार आहे…काळजी घ्या आणि सुरक्षित रहा, लव यू भाई”, असं सलमान खानने या ट्विटमध्ये लिहीलंय.

सलमना खानच्या या ट्विटला अल्लु अर्जुनने ही उत्तर दिलंय. त्यात अल्लु अर्जुन म्हणाला, “खूप खूप धन्यवाद सलमान गुरू…तुमच्याकडून झालेलं माझं कौतूक ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. हा तुमचं प्रेम आहे…राधे फिल्मचं सिटी मार हे गाणं स्कीनवर आपली जादू नक्कीच दाखवेल, ही अपेक्षा…तुम्ही दिलेल्या प्रेमासाठी खूप आभार.”

या गाण्यात सलमान खानची सिन्गेचर डान्स स्टाईल आणि त्याच्यासोबत सुंदर अभिनेत्री दिशा पटानी सेंसेशनल केमिस्ट्री दिसून येतेय. या गाण्यात हूक स्टेप करताना सलमान खान सध्या व्हायरल होतोय. तसंच जानी मास्टरच्या नावाने प्रसिद्ध असलेले शेख जानी बाशा यांची कोरिओग्राफी आणि प्रभूदेवाच्या दिग्दर्शनामुळे या गाण्यात हिप-हॉप सोबतच क्लासिक साऊथ स्टाईल कोरिओग्राफीचं गणित चांगलंच जुळून आलंय. हे गाणं कमाल खान आणि लुलिया वंतूर यांनी गायलं असून शब्बीर अहमद यांनी हे गाणं लिहिलं आहे.