18 September 2020

News Flash

शाहरुखची जखम ही किरकोळ – सलमान

बॉलीवूडमध्ये सध्या उलटे वारे वाहू लागले आहेत. बॉलीवूडचे दोन मोठे प्रतिस्पर्धी सलमान आणि शाहरुख यांची पुन्हा मैत्री झाल्याची चिन्हे दिसत आहेत.

| January 24, 2014 03:30 am

बॉलीवूडमध्ये सध्या उलटे वारे वाहू लागले आहेत. बॉलीवूडचे दोन मोठे प्रतिस्पर्धी सलमान आणि शाहरुख यांची पुन्हा मैत्री झाल्याची चिन्हे दिसत आहेत. नुकत्याच झालेल्या एका पुरस्कार सोहळ्यात शाहरुखने सलमानच्या जय हो चित्रपटाची प्रसिद्धीही केली. महत्वाची बाब म्हणजे सलमानही शाहरुखची प्रशंसा करण्यात मागे राहिलेला नाही आहे.
हॅपी न्यू इयर’च्या चित्रीकरणावेळी शाहरुख खान जखमी; नानावटीत दाखल
गुरुवारीच हॅपी न्यू इयर चित्रपटाच्या सेटवर शाहरुख जखमी झाला. त्याला नानावटी रुग्णायलात उपचारासाठी नेण्यात आले होते. त्यावर सलमानने दुखापत झालेली असतमानाही शाहरुख खूप चांगले काम करत आहे, या शब्दांत त्याची प्रशंसा केली. तसेच, तो म्हणाला की, शाहरुख जखमी झाल्याची बातमी मला समजली. त्याला किरकोळ जखमी झाली असून, उगाचच त्यास लोकांनी ताणू नये. त्याच्यावर कुणी आत्मघातकी हल्ला केला नाही की, त्याचा स्मृतीभ्रंश झालेला नाही. जेव्हा तो जखमी झाल्याची बातमी मला समजली तेव्हा मलाही त्याची काळजी वाटली. पण, त्यानंतर तो ठीक असल्याचे कळले. तो सुखरुप आहे याचा मला आनंद आहे.
डोक्याला झालेल्या किरकोळ जखमेवर मलमपट्टी केल्यानंतर शाहरुखला रुग्णालयातून डीस्चार्ज करण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 24, 2014 3:30 am

Web Title: salman khan dont blow shah rukh khans injury out of proportion
टॅग Salman Khan
Next Stories
1 सलमानने सनी लिओनीला नेसवली साडी!
2 पाहा वरुण धवनच्या ‘मैं तेरा हिरो’ चित्रपटाचा ट्रेलर
3 रणवीर, अर्जूनला बदलून हव्या होत्या ‘गुंडे’मधील भूमिका
Just Now!
X