26 November 2020

News Flash

#DusKaDum : ‘जिसे जिंदगी सिखायें, उसे कौन हराये?’

तब्बल आठ वर्षांनी सलमान दाखवणार ‘दस का दम’

सलमान खान

‘बिग बॉस ११’नंतर सलमान खान टेलिव्हिजनवरील कार्यक्रमांपासून दूर जाणार असा अनेकांचा अंदाज होता. पण दबंग खानच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची गोष्ट आहे. लवकरच सलमान ‘दस का दम’ या शोच्या तिसऱ्या पर्वात दिसणार आहे. या शोचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून सलमानने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून टीझर शेअर केला आहे.

या टीझरमध्ये सलमान एका स्पर्धकाला प्रश्न विचारताना पाहायला मिळत आहे. तर ती स्पर्धक मजेशीर पद्धतीने त्याचं उत्तर देते. ‘दबंग’ खानच्या सूत्रसंचालनातील कॉमेडी अवतार पुन्हा एकदा पाहायला मिळतो. टीझरच्या अखेरीस ‘जिसे जिंदगी सिखायें, उसे कौन हराये?’ अशा टॅगलाइनसह सलमान हा शो लवकरच सोनी वाहिनीवर सुरू होणार असल्याचं जाहीर करतो.

२००९ मध्ये या रिअॅलिटी शोचा दुसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या तिसऱ्या सिझनमध्ये काही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आल्याची माहिती सोनी वाहिनीचे कार्यकारी उपप्रमुख दानिष खान यांनी एका मुलाखतीत दिली होती. अमिताब बच्चन यांच्या ‘कौन बनेगा करोडपती’सारखाच हा एक क्विज शो असून याची संकल्पना थोडी वेगळी आहे. ‘दस का दम’मध्ये स्पर्धक प्रश्नांची उत्तरे टक्केवारीत देतात आणि बक्षिसाची रक्कम १० हजारपासून सुरू होत १० कोटींपर्यंत असते.

नव्या सिझनसाठी शोच्या निर्मात्यांनी एक अॅपसुद्धा तयार केला आहे. या अॅपद्वारे लोकांना घरबसल्या या स्पर्धेत सहभागी होता येईल. जूनमध्ये हा शो प्रसारित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता हा शो बिग बींच्या ‘कौन बनेगा करोडपती’इतकाच प्रसिद्ध होणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 30, 2018 2:02 pm

Web Title: salman khan dus ka dum teaser show coming soon on sony tv
Next Stories
1 … तर मग पौराणिक सिनेमेच बनवावे लागतील – सचिन कुंडलकर
2 VIDEO : निधनाच्या अफवांविषयी खुद्द मुमताज काय म्हणतायेत पाहिलं का?
3 सोनमच्या लग्नाविषयी ‘डॅडी कूल’ अनिल कपूर म्हणतायेत…
Just Now!
X